Skip to content

राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीत दडलंय काय ?


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात झाले असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत व महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, ह्या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास राज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचे प्रमुख कारण असले, तरी यात राजकीय चर्चा होणार नाही. पण असे सांगण्यात येत आहे, की पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे कोणाला पाठिंबा देणार, की तटस्थ राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे आणि शिंदे यांची ही तिसरी भेट

गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तीनदा भेट झालेली आहे. राज ठाकरे याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तर एकनाथ शिंदे हेदेखील बाप्पाच्या दर्शनासाठीच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!