Skip to content

alcohol rate| मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी… दारूच्या किंमती महागणार..!


alcohol rate| मद्यावरील व्हॅटमध्ये राज्य सरकारतर्फे ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, आता दारूच्या दारांवर १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मद्यपींच्या घशावर आणि खिशावर चांगलाच भर पडणार आहे. दारू पिणाऱ्या तळीरामांना राज्य सरकारने चांगलाच मोठा धक्का दिला आहे. १ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या दारुच्या किंमती महागणार असून सरकारने मूल्यवर्धित कर म्हणजे VAT मध्ये ५% वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे. पण, ह्या निर्णयाचा परिणाम फक्त मद्यबाजारावरच नाही तर शेअर बाजारावरही त्याचे पडसाद पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या ह्या निर्णयानंतर आता गुंतवणूकदारांनाही शेअर्सवर लक्ष ठेवून राहावे लागणार आहे. त्यामुळे आता फक्त मद्यपींना नाही तर, ह्या निर्णयाचा परिणाम हा शेअर बाजारावरही होतंणा दिसत आहे.

Dasara | सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांमुळे शेतकऱ्यांसमोर संकट…

 शेअर्सवर काय परिणाम होणार? 
सरकारने दारू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणामदारू विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर दिसंत आहे. सरकारने १ नोव्हेंबरपासून मूल्यवर्धित कर हा ५ टक्क्यांवरून १० टक्के केला असून हा बदल फक्त क्लब, आणि बारमध्ये दारू पिणाऱ्यांसाठी लागू असेल. नॉन-काउंटर विक्री ही  पूर्वीच्या किमतीवरच असेल. जेव्हा कुठल्याही वस्तूचा कर वाढवला जातो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ सामान्य लोकांवरच नाही तर कंपन्यांवरही होतो. पण,  हा अल्पकालीन परिणाम असेल कारण भारतात दारू विक्री खूप जास्त होते आणि सरकारलाही या व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असते.
काही कंपन्यांनी बाजाराच्या अंदाजापेक्षा चांगले परिणाम नोंदवल्यामुळे शुक्रवारी शेअर ४% चढले. त्याचबरोबर अनेक ब्रोकरेज हाऊसनेही कंपनीचे शेअर्स होल्ड करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या कारणास्तव खराब निकाल असला तरीही शेअर्स हिरव्या रंगात दिसत आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!