Government Scheme | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ योजनेच्या निधीत सरकार करणार वाढ

0
1

Government Scheme | केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा त्यामागील हेतू असतो. भारतीय केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’. 1 डिसेंबर 2018 मध्ये ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत हस्तांतरित केली जात असते. आता या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन होते आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) ने एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत आर्थिक सहाय्य वाढवण्याचे समर्थन करण्यात आलेले आहे.  ICRIER अहवालात PM किसान योजना (PM-KISAN) अंतर्गत रक्कम वाढवण्याची मागणीदेखील करण्यात आलेली आहे.

alcohol rate| मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी… दारूच्या किंमती महागणार..!

महागाईनुसार रक्कम बदलली पाहीजे

ICRIER च्या अहवालात असे म्हटले आहे की, PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला फक्त 6,000 रुपये दिले जात आहेत. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर वस्तूंची महागाई अनेक पटींनी वाढलेली आहे. अशा परिस्थितीत सध्याची महागाई लक्षात घेता शेतकऱ्यांना किमान 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. भारतात सर्वात जास्त लहान शेतकरी वर्ग आहे. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. दुसरीकडे मोठ्या शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे. व्यापार धोरणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे या अहवालात सांगण्यात आलेले आहे. या कारणांमुळे PM किसान योजनेंतर्गत मदतीची रक्कम वाढवायला हवी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

‘सर्वपक्षीय-राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी’; असा निर्णय घेणारं गाव नक्की कोणतं?

10 हजार कोटींची केली बचत

केंद्र सरकारने अलीकडेच PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 10 हजार कोटी रुपयांची बचत केलेली आहे. कारण सरकारने या यादीतून अपात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वगळलेले आहे. त्यामुळे भूमिहीन शेतकरी तसेच भाडेकरु यांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

PM किसानचा 15 वा हप्ता कधी मिळणार ?

विशेष म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ अंतर्गत कोणत्याही बदलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सरकार नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 दरम्यान PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी करेल अशी अपेक्षा आहे. परंतु अजुन याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here