Skip to content

Dasara | सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांमुळे शेतकऱ्यांसमोर संकट…


Dasara | दसरा आणि दिवाळी या सणांसाठी झेंडूच्या फुलांना चांगलीच मागणी असते. पुजेसाठी झेंडूची फुलं वापरली जात असताता. यामुळे या सणांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी झेंडूची लागवड करत असतात. मात्र यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी नाराज केल्याचं चित्र आहे. झेंडूचे दर चांगलेच घसरलेले आहेत. पुणे, मुंबई, नाशिकच्या बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा फटका झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. नाशिकमध्ये केवळ १० ते १५ रुपये असा भाव झेंडुला मिळत आहे.

पुण्यात मोठ्या प्रमाणावर झेंडुची आवक

पुणे शहरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झेंडूची फुलं विक्रीसाठी आलेली आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड फुल बाजारात झेंडूची फुले खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली आहे. मध्यरात्रीपासून पुण्यातील बाजारात झेंडू फुलांसोबत शेवंती, गुलाब ही फुलं विक्रीसाठी आली आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमधुन शेतकऱ्यांनी फुलं विक्रीसाठी आणली आहे. बाजारात फुलांची आवक वाढलेली आहे. मात्र फुलांना चांगला दर मिळालेला नाही. यामुळे शेतकरी वर्गासमोर सणांच्या पार्श्वभूमीवर संकट उभे राहीले आहे.

Maratha Reservation| जरांगे- पाटलांच्या घोषणेने सरकारची उडाली झोप..?

नाशिकमध्ये कसे आहेत दर?

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या झेंडूच्या फुलांना कमी दर मिळालेला आहे. शेतकऱ्यांना 10 ते 15 रुपये असा कवडीमोल भाव मिळालेला आहे. झेंडुंच्या फुलांमुळे दसरा दिवाळी गोड होईल, ही अपेक्षा झेंडु उत्पादक शेतकऱ्यांना होती. त्यासाठी यंदा पाऊस नसताना डोक्यावर पाणी वाहून झेंडु शेती जगवली होती. परंतु फुलांना भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे. फुल विक्रीतून दसरा-दिवाळी हे सण गोड होण्याचे बळीराजाचे स्वप्न भंगलेले आहे.

मुंबईतील दर नेमके काय?

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना बाजारात चांगलीच मागणी असते. मुंबईतील दादर मार्केटमध्ये ग्राहकांनी फुले खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. मात्र बाजारात फुलांना मागणी जास्त आहे. त्यानंतरही फुलांना भाव कमी मिळत आहे असं फुल विक्रेत्यांनी म्हटले आहे. झेंडूची फुले ही रविवारी 50 ते 60 रुपये किलोने विकली गेली होती. परंतु सोमवारी त्यामध्ये घसरण झालेली आहे. आता 20 ते 30 रुपयांपासून फुलांची विक्री होत आहे. यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांचे नुकसान होते आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!