Skip to content

Big News | महाराष्ट्रात जाणवले इस्त्राईल आणि हमास युद्धाचे पडसाद… नेमके घडलं काय?


Big News | इस्रायली-हमास यांच्या दरम्यान सुरु असलेले युद्ध अजूनही पेटणार असं दिसत आहे. इस्त्रायलच्या सैन्याने पॅलेस्टिनी नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे आदेश दिलेले आहेत. अन्यथा त्यांनादेखील अतिरेकी समजण्यात येऊन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गाझातील लोकांना उत्तर गाझामधुन दक्षिणेकडे जाण्यास सांगितलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या युद्धाचे पडसाद उमटताना दिसत आहे. या युद्धाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणजे पुण्यात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच रस्त्यावर लावलेले स्टीकरही जप्त करण्यात आले आहे.

Dasara | सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांमुळे शेतकऱ्यांसमोर संकट…

नक्की काय घडलं पुणे शहरात? 

इस्त्रायल-हमास युद्धाचे पडसाद पुणे शहरात उमटलेले आहे. इस्त्रायल-हमास युद्धाच्या निमित्ताने पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आला. पुणे शहरातील काही भागांत इस्त्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत. काही जणांनी पुणे शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी हे कृत्य केलेले आहे.

Horoscope Today 23 October: आज नवमी, या दिवशी तुमच्या भाग्याचे तारे काय सांगतात, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

यावर पुणे पोलिसांची कारवाई

पुणे शहरातील रस्त्यांवर जाणीवपूर्वक इस्त्रायल देशाचे स्टिकर चिटकवल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. तसेच या प्रकरणी पुणे शहरातील 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!