Igatpuri | जि.प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत वाढदिवस साजरा

0
29
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |  वाढदिवस म्हंटलं की, रेव पार्ट्या, डी.जे, पब, बार, टूरमध्ये अनाठायी खर्च करणाऱ्यांची संख्या हल्लीच्या जगात कमी नाही. परंतु हाच अनाठायी खर्च टाळून गरजूंना मदत करण्यासाठी आताची तरुणाई पुढे येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, असाच एक कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. तो इगतपुरी तालुक्यातील बांबळेवाडीतील सुपुत्र वीज वितरण महामंडळ मुंबई येथे कार्यरत असलेले दत्तू चिमाजी भवारी यांनी. वाढदिवशी नाहकपणे उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना मदत होईल आणि त्यांची शाळा व शिक्षणाविषयीची गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सर्वतीर्थ टाकेद बांबळेवाडी येथील दत्तू भवारी हे दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा करतात.

७ जुलै रोजी भवारी यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसा निमित्त मुंबईवरून गावी येताना त्यांनी आपल्या बांबळेवाडी या गावतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पॅड,पेन, पेन्सिल अशा शालेय वस्तु आणल्या आणि जवळपास ७० विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी दत्तू भवारी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, रवी भवारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबळेवाडी येथील मुख्याध्यापक जगन्नाथ लक्ष्मण साबळे, उपशिक्षिका श्रीमती मितल रमेश पिंगटे, उपशिक्षक सुरेश काशिनाथ भारमल, संतोष बांबळे, समाधान मेमाणे, सुधाबाई भवारी, रविंद्र भवारी, नरेश भवारी, राधा भवारी, हर्षदा धादवड – भवारी, अक्षदा भवारी, सिद्धेश भवारी, वैष्णवी भवारी आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ सहकारी मित्र परिवार उपस्थित होता. दरम्यान, यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू ओसंडून वाहत होता.

Igatpuri | घोटी-भंडारदरा रस्ता झाला चकाचक; आ. कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे भाग्य उजळले

शाळेच्या वतीने सत्कारमूर्ती दत्तू भवारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना दत्तू भवारी बोलले की, “विद्यार्थी मित्रांनो मी देखील तुमच्या सारख्याच वयातून खडतर प्रवास करत शिक्षणाला सुरुवात केली. तुम्हाला बघून मला माझं बालपण आठवतं व त्याची आज जाणीव झाली. आमच्या काळात कुठे शर्टची बटन उलटी लावलेली असायची तर कुठ पॅन्ट ला करगुटा अवळलेला असायचा. तर कुठ फाटलेलं आणि ठीगळ लावलेलं असायचं. अशा काळात एक पिशवी म्हणजे आमचं दप्तर असायचं. अशाच परिस्थितीत गुरुजींचा मार खात धाकाने चांगलं शिक्षण घेऊन मी आज मुंबई येथे वीज वितरण विभागात चांगल्या नोकरीला आहे. आज जर बघितलं तर तुम्हाला खूप चांगलं शिक्षण मिळत आहे. तुमची दैनंदिन शिक्षण व्यवस्था खूप चांगली आहे. तुम्हाला आज सर्व शालेय साहित्य व्यवस्था चांगल्या उपलब्ध होत आहे. खूप मोठं व्हा चांगल शिक्षण घेऊन एक चांगल नागरिक बना. तुम्हाला भावी वाटचालीस खूप शुभेच्छा.

भवारी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत शालेय साहित्याचे वाटप करत जो काही स्तुत्य उपक्रम राबविला याचा सर्व तरुणांनी आदर्श घेत येणाऱ्या काळात देशाच्या उगवत्या भविष्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून चांगल्या नोकरीला असलेल्या नोकरदार कर्मचारी अधिकारी वर्गानेही ग्रामीण भागातील आपल्या मायभूमीतील शाळेकडे लक्ष द्यायला हवे. दत्तू भाऊंनी जन्मदिवसाच्या निमित्ताने राबविलेला उपक्रम हा स्तुत्य व अनोखा उपक्रम असून अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. खरोखर मी मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी यावेळी केले.

Nashik | भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पॅनल वर आनंदतरंग कला संचाची निवड


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here