राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक मान्यताप्राप्त भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संचलीत विद्यार्थी निवासी वसतीगृह टाकेद (ता. इगतपुरी जि. नाशिक) या वसतीगृहामधे सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात इ 5 वी ते 10 वी पर्यंतच्या गरीब, हुशार, गरजू व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेण्यासाठी आवाहन वसतीगृहाचे सचिव / चेअरमन प्रकाश जाधव, प्राचार्य तुकाराम साबळे व अधिक्षक राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
Kajwa Mahotsav | काजवा महोत्सव होणार हाऊस फुल्ल; नेमका काय आहे काजवा महोत्सव..?
आरक्षणाप्रमाणे वसतीगृहामधे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. तरी सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चीत करावा. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो इ. कागदपत्रासह प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले असून इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी खालील मोबाइल क्रमांकावर 9595594748 संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
HSC Result | पिंपळगाव जनता विद्यालयाचा १२ वी कला शाखेचा निकाल १००%
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम