Sonia Doohan | राज्यात सध्या प्रत्येक पक्षाचे दोन गट राजकारणात सक्रिय आहेत. यात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, राष्ट्रवादीचे शरद पवार गट (NCP Sharadchandra Pawar) विरुद्ध अजित पवार गट (Ajit Pawar) , भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई सुरू आहे. विरोधी पक्षाचे नेते आपल्या पक्षात खेचण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. यातच आता शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, आता त्यांच्या पाठोपाठ युवतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान (Sonia Doohan) याही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान या देखील अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान धीरज शर्मा आणि सोनिया दुहान या दोघांनीही पक्षापासून अंतर राखल्याचे दिसत होते. तर, यानंतर आता या दोघांचा मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
Sharad Pawar | शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार..?; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Sonia Doohan | कोण आहेत सोनिया दुहान ?
दरम्यान, पक्ष प्रवेशाची चर्चा असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे नेतृत्व करत असून, त्या पक्षाच्या प्रवक्त्या देखील राहिलेल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात पहाटेचा शपथविधी उरकला. त्यावेळी सोनिया दुहान यांनी स्वतः हॉटेलमध्ये जाऊन अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्या चर्चेत होत्या. (Sonia Doohan)
युवकच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून पक्षाचा राजीनामा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा (dhiraj sharma) यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून, फेसबुक पोस्ट करत त्यांनी याबाबत समर्थकांना माहिती दिली आहे. (Sonia Doohan)
Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी’
सोनिया दुहान यांची पोस्ट
८ तासांपूर्वीच सोनिया दुहान यांनी फेसबुक पोस्ट करत इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. या पोस्टमध्ये त्यांनी “लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मी हरियाणातील सर्व मतदारांना सांगू इच्छिते की, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. स्वत:ही इंडिया आघाडीला मत द्या आणि आपल्या कुटुंबियांनाही इंडिया आघाडीला मतदान करावयास सांगा. कारण आपल्या देशातील लोकशाही व आपले संविधान शाबूत ठेवण्यासाठीची ही शेवटची संधी आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम