Hemant Godse | काय सांगता..! नाशिकचे विद्यमान खासदार पुन्हा ठाकरे गटात परतणार..?

0
28
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Hemant Godse |  आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. तसेच आता राज्याच्या राजकारणात आता नाशिकचे राजकीय वजन वाढले असून, हे पाहता सर्वच पक्षांची नशिक लोकसभेवरून रस्सीखेच सरू आहे. नाशिकमध्येही स्थानिक पातळीवर अनेक उमेदवारांना तिकीटाची अपेक्षा आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी नाशिकचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांच्यात केंद्रीय मंत्री दानवेंसमोर टोलेबाजी रंगली होती. एवढंच नाहीतर एकीकडे भाजपने नशिकच्या जागेवर दावा केलेला असताना, दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नशिकच्या जागा शिंदे गटाची असल्याचे म्हटले होते. यानंतर महायुतीमधील नशिक लोकसभेचा वाद हा चव्हाट्यावर आला होता.(Hemant Godse)

Hemant Godse | हेमंत गोडसे नाराज..?

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे नशिक लोकसभेतून हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असून, या मतदार संघावर वारंवार भाजपकडून दावा केला जात आहे. यात नशिक पूर्व मतदार संघाचे विद्यमान आमदार राहुल ढीकले आणि भाजपचे नाशिक जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, यामुळे नाराज असलेले हेमंत गोडसे हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात असून, ते तिकीटासाठी ठाकरे गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असेल.

Hemant Godse Accident | नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा भीषण अपघात

नाशिकचे खासदार ठाकरे गटात परतण्याच्या मार्गावर..?

लोकसभा निवडणूका ह्या अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असून, अनेक नेते हे आपापल्या सोयीनुसार पक्ष निवडत आहेत. तार, पक्षही आपले संख्याबळ वाढवण्यासाठी जंगी तयारी करत आहेत. आतापर्यंत विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांत जात होते. मात्र, बंडाच्या शिंदेंसोबत गेलेले नाशिकचे खासदार हे पुन्हा ठाकरे गटात परतण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Hemant Godse)

नेमकं प्रकरण काय..?

नशिक लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, याचे मुख्य कारण म्हणजे “ठाकरे गटाचे नेते ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका कथित जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट. गेल्या काही दिवसांपासून हेमंत गोडसे हे सातत्याने मिलिंद नार्वेकरांना भेटत असून, हेमंत गोडसेंकडून नार्वेकरांच्यामार्फत शिवसेना ठाकरे गटात एंट्री करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सुधाकर बडगुजर म्हटले होते. दरम्यान, गोडसे ठाकरे गटात जाणार का? हे राजकीय नाट्य लोकसभेच्या तिकीटासाठी सुरू आहे का? बंडखोरांना आम्ही परत घेणार नाही, असं म्हणणरे ठाकरे गोडसेंना स्वीकारणार का? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Hemant Godse)

Lok Sabha 2024 | विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवारात केंद्रीय मंत्र्यांसमोर ‘तु तु मै मै’

हेमंत गोडसेंची कारकीर्द..?

हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. ते पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वापासून त्यांनी त्यांच्या राजकिय करियरची सुरुवात केली होती. यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा नाशिकचे खासदार झाले. यानंतर पुन्हा २०१९ ला ते दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. ते शिवसेनेत येण्याआधी मनसेमध्ये होते. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात येणारे ते पहिले खासदार होते. (Hemant Godse)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here