Skip to content

HDFC Scholarship | पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी HDFC बँक देतेय शिष्यवृत्ती

HDFC Scholarship

HDFC Scholarship |  सध्याच्या काळात शाळांच्या फीज ह्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना मुलांचे शिक्षण चांगल्या शाळा किंवा कॉलेज मधून घेणं हे कठीण झालं आहे. यामुळे बऱ्याच जणांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. त्यामुळे उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असतानाही त्यांना शिक्षण करता येत नाही. बऱ्याच कुटुंबांमध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विद्यार्थी हुशार असूनही त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे काहीवेळा शिक्षण अर्धवट सोडावं लागतं.(HDFC Scholarship)

त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होतं आणि म्हणूनच याचा विचार करुन केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध स्कॉलरशिप आणि शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. याशिवाय शैक्षणिक कर्ज हा एक पर्याय उपलब्ध असतो आणि देशातील विविध बँकांच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना दिलेही जाते. पण HDFC बँकेने एक भन्नाट शिष्यवृत्ती योजना ही अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी आणली आहे. याच योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.(HDFC Scholarship)

HDFC ह्या बँकेच्या माध्यमातून २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षांमधील इयत्ता पहिली ते पदव्यूत्तर शिक्षणापर्यंत गुणवंत आणि गरजू ह्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवायला बँकेने सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबर ही हा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, एचडीएफसी बँकेची ही शिष्यवृत्ती योजना “एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस प्रोग्राम २०२३-२०२४” या नावानेदेखील ओळखली जाते.(HDFC Scholarship)

Government Job | दहावी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची मोठी संधी

किती स्कॉलरशिप मिळणार?

  • इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत– १५ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.
  • इयत्ता सातवी ते बारावी ( सर्वशाखा)- १८ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.
  • आयटीआय/ पॉलिटेक्निक/ डिप्लोमा– १८ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.
  • पदवी (प्रोफेशनल)- २५ ते ५० हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.
  • पदवी (जनरल)- ३० हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.
  • पदव्यूत्तर पदवी( प्रोफेशनल)- ७५ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.
  • पदव्यूत्तर पदवी( जनरल)- ३५ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.(HDFC Scholarship)

काय आहे पात्रता?

१.  HDFC ह्या बँकेच्या परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत. ते सद्यस्थितीत शिक्षण घेत असावे.
२.  तसेच जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांना मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये ५५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
३.  अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं मागील वर्षाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
४. उमेदवार हा भारत देशाचा रहिवासी असावा.(HDFC Scholarship)

कोणते कागदपत्र आवश्यक?

१. विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो
२. मागील वर्षाचे मार्कशीट आवश्यक
३. आधार कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायविंग लायसन्स
४. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ चे शाळा/ महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फी भरल्याची पावती
५. पालकांचा उत्पन्नाचा दाखला(HDFC Scholarship)

Farmers Death | शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

असा अर्ज करावा?

ह्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program ह्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.(HDFC Scholarship)

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?

पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना जर ह्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.(HDFC Scholarship)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!