Government Job | दहावी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची मोठी संधी

0
3
Government Job
Government Job

Government Job | जर तुम्ही १०वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, भारतीय टपाल विभागात (India Post) अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. (Government Job)

भारतीय टपाल विभागात १० वी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल १८९९ पदांवर ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून जर तुम्ही या नोकरीसाठी उत्सुक असाल तर इंडिया पोस्टची अधिकृत वेबसाईट dopsportsrecruitment.cept.gov.in वर ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरावा लागेल. या पदांसाठी १० वी पास ते पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विशेष बाब म्हणजे या जागांसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून केवळ गुणवत्तेच्या आधारे ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. (Government Job)

Winter Update | मालेगावचे तापमान राज्‍यात नीचांकी; जिल्‍हाभरात थंडीचा जोर वाढला

कोणत्या पदांवर होणार भरती?

इंडिया पोस्टच्या या भरती प्रकियेद्वारे एकूण १८९९ पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून या जागा India Post Ministry of Communications द्वारे निघाल्या आहेत.

या पदांवर होणार भरती-

  • ५८५ पदे -पोस्टमन
  • ५७० पदे – MTS
  • 143 पदे – शॉर्टिंग असिस्टंट
  • ३ पदे – मेल गार्ड

ही सर्व पदे स्पोर्ट्स कोटा अंतर्गत निघाली असून डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स (DOP) भारत सरकार या पदांवर भरती करणार आहेत.(Government Job)

Winter session | शिंदेंचे आमदार नाराज; त्यांच्याच बड्या मंत्र्यांची केली तक्रार

निवड प्रक्रिया काय ?

सुरूवातीला नमूद केल्याप्रमाणे या जागांसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराला १०० रूपये शुल्क भरावे लागणार आहे तसेच, या भरती संदर्भातली अधिकची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला  इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here