Skip to content

Winter Update | मालेगावचे तापमान राज्‍यात नीचांकी; जिल्‍हाभरात थंडीचा जोर वाढला

Winter Update

Winter Update | नाशिक शहरासह जिल्‍हाभरात थंडीचा जोर वाढला असून सकाळी दाट धुके आणि दिवसभर ढगाळ वातावरणासह गार वारा वाहत होता. बुधवारी (दि. 0६) मालेगावचे कमाल तापमान २५.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आणि हे राज्‍यातील हे नीचांकी तापमान आहे. (Winter Update)

शहरात सध्या वातावरणात गारवा जाणवत असताना दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्‍याने सूर्याचे दर्शनही दुर्लभ झालेले आहे.

(Winter Update)पुढील 2-3 दिवस अशाच प्रकारे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागा‍यामार्फत वर्तविला जातो आहे. सायंकाळनंतर वातावरणात कमालीचा गारवा जाणवत असून काही दिवसांपासून वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील तापमानात फारशी घसरण झालेली नसली तरी वातावरणात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता जाणवत आहे.

जिल्ह्यात कमाल तापमानात मोठी घसरण सुरू झालेली बघायला मिळत आहे. बुधवारी (दि. ६) नाशिकचे किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २५.७ अंशापर्यत नोंदविले गेले असून आगामी काही दिवस तापमानात घसरण सुरूच राहण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस थंडीचा चांगलाच तडाखा जाणवणार आहे. नाशिकला अवकाळी पावसाने झोडपल्‍यानंतर गार वाऱ्यामुळे वातावरणातील गारठा वाढलेला आहे. (Winter Update)

किमान तापमानात दिवसेंदिवस घट

राज्याच्य बहुतांश भागाला गार वाऱ्यांनी हुडहुडी भरली असून ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुकं पडलेलं बघायला मिळतं आहे. नाशिक शहरात ठिकठिकाणी पहाटे आणि भल्या सकाळी लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.  नाशिकसह राज्यातील इतर जिह्यातही थंडीचा जोर वाढलेला दिसत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!