Samsung Offer | काय सांगता ? येतोय सॅमसंगचा ‘हा’ चार कॅमेऱ्यांचा भन्नाट फोन

0
28
Samsung Offer
Samsung Offer

Samsung Offer |  Samsung Galaxy A25 5G ह्या स्मार्टफोनची माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार ऑक्टाकोर एक्सिनॉस १२८० चिपसेट हा दिला जाऊ शकतो. ह्यात Galaxy A24 सारखीच डिजाइन मिळणार आहे. विशेष म्हणजे याची स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या माध्यमातून १ टीबी पर्यंत वाढवताही येऊ शकतो.(Samsung Offer)

दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung चा Galaxy A25 5G हा लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. याच्या डिजाइन तसेच स्पेसिफिकेशन्सची माहिती ही काही माध्यामातून समोर आलेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर एक्सिनॉस १२८० चा चिपसेट दिला जाऊ शकतो. याची डिजाइन Galaxy A24 ह्याच्या सारखीच असण्याची शक्यता आहे.(Samsung Offer)

टिप्सटर Arsene Lupin (@MysteryLupin) ने ह्या स्मार्टफोनचा कथित मार्केटिंग पोस्टर शेअर केलेला आहे. Samsung Galaxy A25 5G ने पुढील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा येलो, ब्लू तसेच ब्लॅक ह्या कलर्समध्ये उपलब्ध होऊ शकतो. ह्या पोस्टरवरून समजलं आहे की, हा अँड्रॉइड १४ यावर आधारित One UI 6 वर चालणार आहे.(Samsung Offer)

HDFC Scholarship | पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी HDFC बँक देतेय शिष्यवृत्ती

ह्या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल HD+ (१,०८०x२,३४० पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले यासह १,००० निट्स पीक ब्राइटनेस व १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह मिळणार आहे. हा ६ जीबी व ८ जीबी RAM तसेच १२८ जीबी व २५६ जीबी या स्टोरेज ऑप्शनसह येऊ शकतो. याची स्टोरेज को मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून १ टीबी पर्यंत वाढवता येईल.

ह्या स्मार्टफोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा यूनिटमध्ये एफ १.८ अपार्चर सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेराही असू शकतो. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर व २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सरही मिळू शकतो. तर फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलसाठी १३ मेगापिक्सलचा सेन्सरदेखील मिळू शकतो. ह्यात ५,००० एमएएचची बॅटरी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळणार आहे.

Galaxy S24 सीरिज 

सॅमसंगच्या Galaxy S24 ह्या सीरीज देखील लवकरच बाजारात दाखल होणार आहे. ज्यात Galaxy S24, Galaxy S24+ व Galaxy S24 Ultra चा समावेशही केला जाऊ शकतो. भारताच्या BIS सर्टिफिकेशन्सवर Galaxy S24+ दिसला आहे. मात्र, स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहितीदेखील मिळाली नाही. Galaxy S24 ह्या सीरीजमध्ये AI कॅमेरा क्षमतादेखील मिळू शकते, जी Google कंपनीच्या Pixel 8 ह्या सीरीजला टक्कर देणार आहे.(Samsung Offer)

Farmers Death | शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

Galaxy S24 Ultra मध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स, ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स तसेच १० मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सरदेखील दिला जाऊ शकतो. ह्या कंपनीनं नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये Galaxy S23 ही सीरीज लाँच केली होती. Galaxy S24 ह्या सीरीजमध्ये अ‍ॅल्युमीनियमच्या ऐवजी टायटेनियम ह्या फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो. दरम्यान, कंपनीने ह्या सीरीजबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.(Samsung Offer)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here