धारणगावचे खडी क्रशर सील; अठरा लाखांचा दंड

0
1

द पॉईंट नाऊ: निफाड तालुक्यातील धारणगाव वीर मधील खडी क्रॅशर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करून १८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. धारणगाव वीर येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गौण खनिज उत्खनन सुरू होते. या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
धारणगाव वीर येथील नागरिक बन्सीलाल नारायण कुमावत यांच्या मालकीची जागा ७०/२ या गट नंबरला भेट दिली. त्याठिकाणी अवैध उत्खनन सुरू होते. या ठिकाणाहून १०० ब्रास दगड, ५० ब्रास खडी उत्खनन केल्याचे तपासणीत समोर आले. या उत्खननासाठी संबंधित क्षेत्र बिगर शेती केले नाही, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, हरीत लवाद, जिल्हाधिकारी नाशिक यांची परवानगी घेतली नाही तसेच ग्रामपंचायतचे कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र किंवा ग्रामसभेचा ठरावही नसताना राजरोसपणे उभा डोंगर फोडला आहे. या कारवाईत खडी क्रशरचे पाच बेल्ट, १ क्रशर मशीन, १ लोखंडी साठा असे साहित्य जप्त करून कुमावत यांना १८ लाख ४० हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला.
त्यानंतर खडी क्रशरही सील करण्यात आले आहे. तलाठी गणेश जगताप, मंडळ अधिकारी पी. पी. केवारे यांच्या ताब्यात सदर साहित्य देण्यात आले. जिल्हा खनिकर्म अधिकारी पथकाची निफाड तालुक्यातील ही सर्वांत मोठी कार्यवाही असून, त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here