Skip to content

कमळाबाईचा अन् मुंबईचा संबंध काय ? , उद्धव ठाकरे आक्रमक


मुंबई: आज शिवसेनेचा मुंबईत गट प्रमुखांचा मेळावा होत असून मेळाव्यात उध्दव ठाकरे फारच आक्रमक झाले. दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार हे त्यांनी ठणकावून सांगितले.

महत्वाचे मुद्दे…

सद्या महाराष्ट्रात बाप पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे.

संजय राऊत लढताय मेंढे बाहेर गेले निष्ठावंत लढतायत
महाराष्ट्रात अनेक शहा येवून गेले ते म्हटले शिवसेनेला जमीन दाखवा , मात्र आपण त्यांना आस्मान दाखवू.

मुंबई तुमच्यासाठी विकण्यासाठी जमीन असेल पण ही आमची मातृभूमी आहे.

कमळाबाईचा अन् मुंबईचा संबंध काय ? ढोकळा खायला सुरत जाव लागले.

स्वांतंत्र्य महाराष्ट्राच्या चळवळीत माझे आजोबा होते. महाराष्ट्राच्या लढ्यात जन संघाने फूट पाडली.

25 वर्ष युतीत सडली नालयक माणसांना आपण पोसले.

वंश वादावर बोलताय तुमचे वंश नेमके कोणते 52 कुळे की 152 कुळी

पेंग्विन आणले ते अभिमानाने सांगतो.

मुंबईतील आर्थिक केंद्र गुजरातला पळवल.

मिंदे गट गेलाय दिल्लीत मुजरा करायला.

मुंबईत संकट येतो तेव्हा शिवसैनिक धावून येतात.

मुंबई हे देशाच आर्थिक केंद्र असून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता का ? वेदांतावरून धादांत खोट बोलताना लाज नाही वाटत ? कुणाशी भांडताय ? आम्हीं येऊ तुमच्यासोबत, आणतो म्हणा, परत आणा. मिंधे गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असा घणाघात केला.

माझ्या घराण्याचा अभिमान – उद्धव ठाकरे
ठाकरे म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील घडामोडी तुम्हांला माहित हव्यात. तेव्हाचा जनसंघ हा समिती फोडणारा होता हा यांचा वंश आहे आणि ही त्यांचीच औलाद आहे. होय पुन्हा सांगतो पंचवीस वर्ष युतीत आमची सडली, कुजली. असली ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. काही न करता यांना उपमहापौर पद मिळालं… मेहनत करायची शिवसैनिकांनी अन् पद द्यायचे यांना. वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे… तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे उपरे घेतले भरले आहेत.. तुमचा वंश कुठला? असा सवाल ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला आहे.

आईवर चालून येणार्‍याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
हे येतात आणि बोलून जातात मुंबई संकटात असते तेव्हा कुठे जाता हे ? निवडणुका आल्या तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील स्क्वेअर फूट प्रमाणे विकायची जमीन असेल पण आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे हे लक्षात ठेवा. या आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून सांितले.

मुंबईवर लचके तोडणारी गिधाड घिरट्या घालताय – ठाकरे
सद्या मुंबईवर लचके तोडणारी गिधाड घिरट्या घालत आहेत, ही औलाद फिरायला लागली महाराजांच्या काळातही आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आले आता देखील त्या कुळातील शहा येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू तुम्हीं प्रयत्न कराच, तुम्हांला आम्हीं आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!