Good News | खवय्यांसाठी खुशखबर; देवगड हापूस आंबा बाजारात

0
35

Good News : पुणे | आंब्याला फळांचा राजा म्हटले असून बच्चे कंपनीपासून ज्येष्ठापर्यंत अनेकांना आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच देशातच नाही तर विदेशात हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता हापूस आंबा बाजारात दाखल झालेला आहे. पुणे बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आलेली असताना देवगड हापूसच्या आगाप उत्पादनातील आंब्याची पहिली आवक पुणे बाजार समितीतील गुलटेकडी मार्केटमध्ये आलेली आहे. आंब्याची पहिली पेटी घेण्यासाठी ग्राहकांनी बोली लावली आहे. त्यामुळे उत्पादनाआधीच्या हापूसच्या पहिल्या पेटीला उच्चांकी दर मिळालेला दिसून आला.

Raj Thackeray | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात

हापूसच्या पहिल्या पेटीला किती दर?

हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर झालेला आहे. त्यांच्याकडे देवगड हापूसच्या पाच पेट्या आलेल्या होत्या. या पाच पेट्यांपैकी 5 डझनच्या एका पेटीला तब्बल 21 हजार रुपये दर मिळाला आहे. त्या खालोखाल इतर पेट्यांना 15 हजार आणि 11 हजार दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Manoj Jarange | मला कधीही अटक होऊ शकते; मनोज जरांगेंचा आरोप

हापूस आंब्याची पहिली पेटी विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये चांगलीच चढाओढ लागलेली दिसून आली. अखेर कोथरुडमधील रहिवाशी जोतिराम बिराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी या आंब्याची खरेदी केलेली आहे. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा होता तर हंगामपूर्व उत्पादनातील आंब्याची ही पहिलीच आवक होती. प्रत्येक वर्षी सुरुवातीलाच आब्यांची पेटी दाखल होत असते. आता टप्पाटप्याने देवगड हापूसचा हंगाम सुरु होत असून फेब्रुवारीपासून नियमित हंगाम सुरु होणार आहे.

कोकणातील हापूस आंबा पुणे शहरात आलेला असताना हा आंबा दक्षिण आफ्रिका येथील मालावी शहरातून आलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतून सध्या 10 पेट्या कोल्हापुरात दाखल झालेल्या आहेत. 15 आंबे असलेल्या एका पेटीची किंमत 3800 रुपये आहे. कोकणातील हापूसचे कलम आफ्रिकेत नेली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here