Skip to content

Mla Disqualification | ठाकरेंनी दाखवला पुरावा अन् शिंदेंच्या अडचणी वाढणार?


 Mla Disqualification |  शिवसेना आमदार आपत्रता प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ठाकरे गटाने  बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचे आदेश हे ज्या मेल आयडीवर दिलेले होते. तो मेल आयडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाहीच असा दावा हा शिंदे गटाच्या वकिलाने केला होता. पण, आता ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट पुरावाच सादर केलेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ह्या ईमेल आयडी वरून सुनावणी दरम्यान चांगलाच वाद रंगलेला असताना, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाकडून ई-मेल संदर्भात केलेल्या आरोपांवर उत्तर दाखल केलेलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची गेल्या ५ ते ६ दिवसांपासून उलटतपासणी ही होत आहे. त्यांच्या उलटतपासणीचा आजचा हा शेवटचा दिवस आहे.(Mla Disqualification)

शिवसेना शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून देवदत्त कामत हे युक्तिवाद करीत आहेत. आम्ही संबंधित मेल पाठवलेला ईमेल आयडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरा ईमेल आयडीच आहे, जो विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेतदेखील असल्याचा दावा यावेळी ठाकरे गटाने केला आहे.

Crime news | मौलानाने मशिदीत चिमुकलीवर केले अत्याचार

ठाकरे गटाचे पुराव्यासह उत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २२ जून २०२२ रोजी ठाकरे गटाकडून पाठवलेल्या पत्राच्या ईमेल आयडीसंदर्भात शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसंच शिंदे यांचा हा ईमेल आयडी चुकीचा असल्याचेही अध्यक्षांना दिलेल्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाकडून आज यासंदर्भात पुराव्यासह उत्तर सादर करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून उत्तर दाखल करत असताना २० जून २०२२ रोजी राज्याच्या विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका, देखील आपल्या उत्तरांमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये राज्यातील सर्व आमदारांचे नाव, पत्ता, फोन नंबर तसेच त्यांचा ईमेल आयडीदेखील आहे. (Mla Disqualification)

 शिंदेंचा ईमेल आयडी

ह्या पुस्तिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा eknath.shinde@gmail.com असा आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा ठाकरे गटाने नमूद केलेल्या तसेच त्यासोबतच बैठकीसाठी पत्र ज्या ईमेल आयडीवर पाठवलेलं होतं, त्याच ईमेल आयडीचा संदर्भदेखील ह्या पुस्तिकेमध्ये असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मेल आयडी अस्तित्वातच नसल्याचा दावा केलेला होता. शिवाय, २०२३ च्या ह्या पुस्तिकेमधील आमदारांच्या माहितीचा संदर्भ देत, एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा ministereknathshinde@ gmail.com असा असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. दरम्यान, त्याला आता ठाकरे गटाने पुराव्यासह उत्तर दिलं आहे.  (Mla Disqualification)

Good News | खवय्यांसाठी खुशखबर; देवगड हापूस आंबा बाजारात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!