Good News | Hyundai Car कंपनी देत आहे बंपर डिस्काऊंट

0
29

Hyundai Car |  वाहन उत्पादक कंपनी ह्युंडाई मोटर्सने स्पेशल फेस्टिव्ह सिझनची घोषणा केलेली आहे. ज्यानुसार कंपनी निवडक लोकप्रिय मॉडेल्सवर 50,000 रुपयांपर्यंतची सूट देऊ कराणार आहे. जर तुम्ही ह्युंदाईची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑक्टोबर 2023 म्हणजेच या महिन्यात ह्युंदाई आपल्या अनेक मॉडेल्सवर ऑफर्स देत आहे, ज्याचा लाभ तुम्हीदेखील मिळवू शकता. Good News

Hyundai Grand i10 Nios

Hyundai Grand Nios i10 Nios ही एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. या सणासुदीच्या काळात कंपनी या मॉडेलवर 43 हजारांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये 30,000 रुपयांची रोख सूट तसेच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस व MNC आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3,000 रुपयांची सूट समाविष्ट आहेत. सध्या भारतीय बाजारात Hyundai Grand i10 Nios ची किंमत 5.84 लाख रुपये इतकी आहे. यामध्ये वापरकर्त्यांना 1.2 लिटरचं इंजिन देण्यात आलेलं आहे.

kolhapur | ‘गोकुळ’ विरोधात शेतकरी आक्रमक; कार्यालय व चिलिंग सेंटरची मोडतोड 

Hyundai Aura

Hyundai Aura ही ह्युंदाईची सेडान कार आहे.  हे मॉडेल ग्रँड i10 या मॉडेलवर आधारित आहे. Hyundai ऑक्टोबर महिन्यामध्ये या मॉडेलवर 33 हजारांपर्यंत डिस्काऊंट देत आहे. ज्यामध्ये Petrol AMT आणि MT प्रकारांवर 10,000 रुपयांची रोख सूट आहे तर CNG प्रकारांवर ही सूट 20,000 रुपये आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही समाविष्ट आहे.

Hyundai verna हे कंपनीचे एक लोकप्रिय मॉडेल आहे. आतापर्यंत या कारचे अनेक फेसलिफ्ट आणि नवीन जनरेशनमधील मॉडेल्स भारतीय बाजारात लाँच झालेले आहेत. नुकतेच कंपनीने याचं नवीन अपडेटेड मॉडेल लाँच केलेलं आहे. या कारवर ग्राहकांना 25 हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. ही कार तुम्ही 10.96 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये खरेदी करू शकता. या कारला GNCAP मध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेलं आहे.

Maharashtra | शेतकऱ्यांनो आपली पिके सांभाळा…! 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

Hyundai i20 N Line

Hyundai i20 हे मॉडेल कंपनीच्या N सेगमेंटमधील मॉडेल आहे. कंपनी आपल्या i20 N सेगमेंटमधील प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर 50 हजारांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहेत. कंपनी आपल्या एन-लाईनवर 10,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्सही देत आहे. फेसलिफ्ट ह्युंदाई N सेगमेंटवर 10 हजारांचा डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here