Petrol Diesel Price| सणासुदीला राज्य सरकारकडून गुड न्यूज… इंधन दर झाले कमी..?

0
1

Petrol Diesel Price|   महागाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात आणण्यासाठी सरकार हालचाली करत आहे. त्यामुळे प्रामुख्याने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यासंदर्भात साधारण तीन प्रस्ताव जीएसटी विभागातर्फे राज्य सरकारसमोर सादर करण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवायचे असतील तर राज्याच्या तिजोरीवर बोजा येणार असून पेट्रोलसाठी ५० कोटी तर डिझेलसाठी १५० कोटी इतका भार सहन करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या राज्यात पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढत आहेत. अनेक मुंबई, नवी मुंबई, ठाणे व छत्रपती संभाजीनगरसारख्या महापालिका क्षेत्रात पेट्रोलवर प्रतिलिटर ५.१२ रुपयांसह २६ टक्के व्हॅट आकारला जातो. उर्वरित राज्यात प्रतिलिटर हे प्रमाण २५ टक्के आणि ५.१२ रुपये इतके आहे. या महापालिका क्षेत्रांत प्रतिलिटरवर २४ टक्के, उर्वरित राज्यात २१ टक्के इतका व्हॅट कर आकारण्यात येतो.
Government Scheme | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ योजनेच्या निधीत सरकार करणार वाढ
काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती बघता येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फटका बसू शकतो. यामुळे निवडणुकांच्या आधी या किंमतीबाबत विशेषत: व्हॅट कमी करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

असे आहेत प्रस्ताव… 

याबाबतचा अहवाल जीएसटी विभागाकडून सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान यात प्रामुख्याने तीन प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई व छत्रपती संभाजीनगर सारख्या महापालिका क्षेत्रांमध्ये व्हॅट कमी करून उर्वरित राज्याच्या धर्तीवर व्हॅट आकारण्यासंदर्भात प्रमुख प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलपासून मिळणारा ५० कोटी, तसेच डिझेलमुळे मिळणारा १५० कोटींचा महसूल कमी होऊ शकतो. त्याबरोबरच संपूर्ण राज्यात एकच ‘रेव्हन्यू न्यूट्रल वन रेट’ लागू करण्या बद्दलही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यानुसार पेट्रोलचा व्हॅट दर ०.११ प्रतिलिटर, तसेच डिझेलसाठी ०.१५ रुपये प्रतिलिटरने वाढू शकतो. समान दराच्या प्रस्तावामुळे राज्याच्या महसुलात कोणताही परिणाम होणार नसल्याचेही ह्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सरकार आता कोणता प्रस्ताव विचारात घेते, यावर दरांचे गणित अवलंबून असणार आहे.

alcohol rate| मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी… दारूच्या किंमती महागणार..!


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here