Shirdi | साईबाबांची शिर्डी सजली; चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सवास भाविकांची जमली गर्दी

0
14

Shirdi | दरवर्षीं साजरा होणाऱ्या चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला आज पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झालेली आहे. पुढील चार दिवस शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा होणार आहे. तसेच आजपासूनच भक्तांची मांदियाळी साईनगरी शिर्डीत दिसून येत आहे. आज पहाटे काकड आरतीनंतर तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते पाद्य पूजा आणि ग्रंथ मिरवणूक पार पडली.

Government Scheme | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ योजनेच्या निधीत सरकार करणार वाढ

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार (दि. 23) ते गुरुवार(दि. 26)ऑक्टोबर या कालावधीत साईबाबांचा 105 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो आहे. आज पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झालेली आहे. त्यानंतर उत्सवाचा पहिला दिवस सोमवारी काकड आरती, बाबांच्या फोटोची आणि पोथीची मिरवणूक, श्रीसाईचरित्र अखंड पारायणाचा श्रीगणेशा, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती, कीर्तन, रात्री पालखीची मिरवणूक, शेजारती असे विविध कार्यक्रम पुर्ण होत आहेत. दरम्यान पारायणामुळे द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. मुख्य दिवस मंगळवारी काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींबाबांच्या फोटोची आणि पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, कीर्तन, भिक्षा झोळी कार्यक्रम, आराधना विधी, खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन, रात्री रथ मिरवणूक, शेजारती, कलाकारांची हजेरी असे वेगवेगळे कार्यक्रम पार पडतील.

उद्या उत्सवाचा प्रमुख दिवस असून राज्यभरातून येणाऱ्या साई भक्तांना दर्शन घेतल्यावर उद्या रात्रभर साईबाबा मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलेला आहे. साई मंदिर परिसरातील चार नंबर प्रवेशद्वारासमोर आकर्षक असा राम मंदिराचा देखावादेखील उभारण्यात आलेला आहे.  मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विनामूल्य वेगवेगळ्या प्रतिकृती या साकारण्यात येत असतात. यावर्षी साकारलेला राम मंदिर देखावा आणि प्रभू श्रीरामाची 23 फूट मूर्ती साई भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानचे CEO पी. शिवा शंकर यांनी केलेले आहे.

Big News | महाराष्ट्रात जाणवले इस्त्राईल आणि हमास युद्धाचे पडसाद… नेमके घडलं काय?

मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार 

दरम्यान साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. मुंबईच्या द्वारकामाई मंडळाने मंदिर परिसरात भव्य महाद्वार उभारलेले आहे. श्री साई पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने दिवस विविध चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे अवघी साई नगरी शिर्डी सजली असून इथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. तर या चार दिवसांच्या उत्सव काळात मुख्य समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना साईबाबांचे मनोभावे दर्शन घेता येणार आहे. तसेच यातच दसरा देखील असल्याने या दिवशी सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळु शकते आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here