ब्रेकिंग | नाशकात वातावरण तापलं! भुजबळांचा ताफा जाताच गावकऱ्यांनी गोमुत्र शिंपडलं

0
31

ब्रेकिंग नाशिक | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये आहेत. नाशकात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची ते पाहणी करत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला नाशिकमधील मराठा समाजाने कडाडून विरोध केलेला आहे. आज सकाळपासूनच नाशिकच्या येवल्यात मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध केला जातो आहे. मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत यावेळी गोमूत्र शिंपडलेलं आहे. येवल्याच्या सोमठानदेश गावातील ज्या मार्गावरून छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं आहे.

Big News | मसाल्यांना दरवाढीची फोडणी? अवकाळीचा मसाला बाजारालाही फटका

मराठा समाजाने केला तीव्र विरोध

अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करता आहेत. या पाहणी दरम्यान छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलेलं आहे. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलन करत छगन भुजबळांचा निषेध नोंदवला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचा हा पाहणी दौरा संपल्यानंतर ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ परतले त्याच रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलेलं आहे. सोमठानदेश इथे पाहणी दौरा आटोपून मंत्री भुजबळ परतले. तेव्हा त्या रस्त्यावर गोमुत्र शिंपडण्यात आलेलं आहे. दौरा आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघालेले असतांना आंदोलकांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. अर्धनग्न होत आंदोलकांनी काळे शर्ट फिरवत मंत्री छगन भुजबळांचा निषेध केला. यावेळी छगन भुजबळ ‘गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या.

Yeola | ‘जमीनीचा ७/१२ आमच्या बापाचा’; भुजबळांच्या येवला दौऱ्याला मराठ्यांचा विरोध

लासलगावातील कोटमगाव रेल्वे पुलाजवळ मराठा समाज आक्रमक झालेला आहे.  यावेळी ‘छगन भुजबळ गो बॅक’ च्या पाट्या हातात घेवून मराठा आंदोलक घोषणाबाजी करत आहेत. लासलगाव जवळील कोटमगाव इथे नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्याआधीच भुजबळांना विरोध करण्यात येतो आहे. ‘भुजबळ गो बॅक’ चे पोस्टर रेल्वे पुलाच्या भिंतीला चिकटवलेले आहेत. रस्त्याचे आणि पाण्याचे काम होत नसल्याने लासलगावमधील ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. आश्वासने नकोत तर कामं करा…, असं म्हणत या ग्रामस्थांनी ताफा थांबवून मंत्री छगन भुजबळांना निवेदन दिलेलं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here