Gold Rate Today | या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, या महिन्यात ३ जानेवारीपासून सातत्याने सोन्याच्या दरांमध्ये घसरण होत आहे. या आठवड्यातही हे घासरणीचे सत्र सुरूच आहे. ह्या महिन्यात सोने तब्बल १२०० रुपयांनी खाली आले आहे. तर, हे भाव अजूनही खाली येण्याची शक्यता आहे. मात्र, काल पर्यंत घसरत असलेली चांदी अचानक सावरली आहे. चांदीचे दर हे आज वाढले असून, यात २०० रुपयांची भर पडली आहे. दरम्यान, असे आहेत सोने-चांदीचे आजचे दर…(Gold Rate Today)
सोन्याचे घसरणीचे सत्र सुरूच
गेले वर्षभर तेजीत राहत, सामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सोन्याच्या किंमतींमध्ये या वर्षात घसरण सत्र सुरू आहे. मात्र, यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आता सराफ बाजारातील गर्दीही वाढली आहे. या महिन्यात असे आहे सोन्याच्या घासरणीचे सत्र. अनुक्रमे ३ आणि ४ जानेवारी रोजी सोन्याच्या दरांमध्ये ४४० रुपयांची घसरण झाली. तर ५, आणि ८ जानेवारी रोजी १३० आणि २२० त्रा, ९ जानेवारीला १०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, आज गुडरिटर्न्सनुसार, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,८५० रुपये असे झाले आहे. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे आज ६३,१०० रुपयांवर पोहोचले आहे.(Gold Rate Today)
Gold Rate Today | सोने खरेदीची हीच उत्तम संधी; असे आहेत आजचे दर
Gold Rate Today | चांदीत इतकी दरवाढ
गेल्या वर्षात सोन्याच्या मागोमाग तेजीत असलेल्या चांदीच्या दरांमध्येही या महिन्यात घसरण पाहायला मिळाली. काल पर्यंत चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. तर या महिन्यात चांदीतील घासरणीचे सत्र हे पुढीलप्रमाणे होते. तर, अनुक्रमे ३ जानेवारी रोजी ३००, ४ जानेवारी रोजी २०००, ८ जानेवारी रोजी २०० रुपयांनी चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली होती. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचा भाव हा ७६,६०० रुपये असा आहे.(Gold Rate Today)
Gold Rate Today | सोने-चांदीत मोठी घसरण; असे आहेत आजचे दर
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सध्या सोन्यात स्वस्ताई आली असून, चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,४१५ रुपये
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,१६५ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५७,१७२ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,८११ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,५१३ रुपये,
तर, एक किलो चांदीचे आजचे दर हे ७१,८४० रुपयांवर पोहोचले आहे. (Gold Rate Today)
(टीप- वरील माहिती ‘द पॉइंट नाऊ’ फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. वरील दर सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दारांसाठी स्थानिक ज्वेललरशी संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम