Gold Silver price | सोने-चांदी स्थिरावली; इतके घसरले भाव

0
30
Gold Silver price
Gold Silver price

Gold Silver price | गेल्या अनेक दिवसांच्या सुरू असलेल्या घोडदौडीनंतर सोने-चांदीने आज खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. मागील दोन दिवसांत सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver price)मोठी पडझड दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत नशीब आजमावले. सोने-चांदीच्या किंमती ह्या पार गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या किंमती (Gold Silver price) ह्या ६७,००० रुपयांवर स्थिरावले असून, पण चांदी ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

ऐन लग्नसराईत सोन्याच्या वाढलेल्या भावांनी वर-वधू पित्याचे टेन्शन वाढवले. ऐन लग्नसराईतच ह्या मौल्यवान धातूंनी मोठी मुसंडी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही शहरी भागात तर सोन्याला पर्याय म्हणून प्लॅटिनमच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. या दोन दिवसांत सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver price)घसरण झाली आहे.

असे आहेत रेकॉर्ड

सराफ बाजारात सोन्याने ६५ हजारांचा टप्पा ओलांडला असून, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, यावर्षी ४ मे २०२०३ रोजी सोन्याने विक्रमी टप्पा गाठला होता तेव्हा २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Silver price)ही ६१,६४६ रुपये अशी होती.

त्यानंतर १ डिसेंबर पासून दररोज सोन्याच्या किंमतीने (Gold Silver price)नवनवीन रेकॉर्ड केले. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६३,२८१ रुपयांवर पोहचली आहे. तर, चांदी ही ७६,४३० रुपये किलो अशी झाली होती. पण प्रत्यक्षात अनेक सराफ बाजारांमध्ये सोने हे ६६,००० रुपयांच्या घरात पोहचले होते. तर, काही शहरात चांदी ही ७८,००० रुपयांच्या घरात पोहचलेली होती.

Nashik Missing Case | नाशिकमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

दोन दिवसांत इतकी घसरण

या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांतच सोने १,०३० रुपयांनी (Gold Silver price)वाढले आहे. या आठवड्यात ४ डिसेंबर रोजी सोन्यात ४४० रुपयांनी दरवाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये  घसरण झाली आहे. ५ डिसेंबर रोजी सोने १००० रुपयांनी खाली आले. तर, ६ डिसेंबर रोजी त्यात ४०० रुपयांणी घसरण झाली. १,४०० रुपयांनी किंमती उतरल्यात. गुडरिटर्न्सनुसार, (Gold Silver price)आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,६०० रुपयांवर तर, २४ कॅरेट सोने हे ६२,८२०  रुपयांवर पोहोचले आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, (Gold Silver price)२४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ६२,१४४ रुपये तर, २३ कॅरेट सोने हे १,८९५ रुपये असे आहे. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५६,९२४ रुपये असे आहे. १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ४६,६०८ रुपयांवर पोहोचले आहे.१४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ३६,३५४ रुपये असे आहे. तर, एक किलो चांदीचा भाव हा ७४,२६८ रुपये झाला आहे.(Gold Silver price)

Pune | ‘माझी नाही तर, कोणाचीच होऊ देणार नाही’; भररस्त्यात तरुणीला मारहाण


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here