Skip to content

Agriculture | केंद्राचा मोठा निर्णय! बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी

Agriculture news

Agriculture |  केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने राज्यातील नीरा देवघर या प्रकल्पासाठी ३,५९२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. ज्यात आता केंद्र शासन हे आपला ६० टक्के वाटा म्हणजेच २,३४०  कोटी रुपये हे पंतप्रधान कृषी सिंचाई ह्या योजनेद्वारे देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे १४ टीएमसी पाणी हे दिले जाणार आहे.(Agriculture)

त्यामुळे सिंचन क्षेत्रात यामुळे दुपटीने वाढ होणार आहे. आजवर कालव्याने पाणी देताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यव होतो. त्यामुळे या योजनेमधून सूक्ष्म सिंचन व बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाचे जास्तीत जास्त क्षेत्र हे ओलिताखाली आणले जाणार असल्याचे यावेळी खासदार रणजित निंबाळकर यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे हा देशातील असा पहिला प्रयोग असणार आहे.(Agriculture)

 या प्रकल्पाच्या पाहणीसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी खासदार रणजित निंबाळकर व केंद्रीय सचिवांच्या सोबत १३ फेब्रुवारी रोजी हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाच्या CWC च्या कमिटी बैठकीत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून, प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे सर्व अडथळे संपले असल्याचे संगितले जात आहे. तर, याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावाही केला जात आहे.(Agriculture)

Gold Silver price | सोने-चांदी स्थिरावली; इतके घसरले भाव

‘या’ भागांना फायदा

या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ४० टक्के तर, केंद्र सरकार ६० टक्के खर्च उचलणार असून, राज्य सरकारने यासाठी पूर्वीच ५०० कोटी रुपये दिलेले आहेत. या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा ह्या जिल्ह्यातील फलटण, खंडाळा आणि सोलापूर ह्या जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर या भागाला मोठा फायदा होणार आहे. नुकत्याच जलशक्ती मंत्रालयाच्या गुंतवणुकीच्या संदर्भात झालेल्या या बैठकीत मान्यता या प्रकल्पास मान्यता देण्यात आल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह यांनी सांगितलेले आहे.(Agriculture)

Dhule Crime | चिमुकला भाचा रडत होता; संतापलेल्या मामानेच भाच्याला संपवलं

 प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत पूर्ण

या प्रकल्पाला पंतप्रधान कृषी सिंचाई ह्या योजनेतून जवळपास २,३४० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या ह्या अटीवर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने यास मान्यता दिली असल्याने लगेचच गतीने ह्या कामांना सुरुवात होणार आहे. यापूर्वी नीरा देवघरच्या पाण्याचा लाभ हा फक्त बारामतीकर घेत असल्याचा आरोप केला जात होता.(Agriculture)

त्यामुळे, या प्रकल्पात राजकीय अडथळेही निर्माण झालेले होते. पण, माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी पाठपुरावा करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हा निधी मिळविलेला आहे. आता या प्रकल्पात पाण्याचा काटकसरीने वापर करून याचा लाभ करमाळा तसेच माढा तालुक्यालाही देण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले आहे.(Agriculture)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!