Skip to content

लग्नात नवरदेवाने गोळी झाडल्याने लष्करात कार्यरत मित्राचा मृत्यू


द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तर प्रदेशात (UP) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवरदेवाने (Groom) लग्नात (Marriage) चुकून आपल्या मित्राला गोळी घातल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशच्या (UP) सोनभद्र येथे एक लग्नसोहळा होता. यात सर्व आनंद साजरा करत होते. आणि यादरम्यान नवरदेवाने हवेत गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती गोळी त्याच्या मित्राला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. बाबू लाल यादव असे मृताचे नाव असून, तो लष्करात कार्यरत होता. दरम्यान नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

नवरदेवाचा लग्नाचा जोश त्याच्या लष्करात कार्यरत असणाऱ्या मित्राला (Friend) महागात पडला. लग्नात नवरदेवाकडे हे पिस्तुल (Pistol) कसे आले, त्याला लग्नाच्या ठिकाणी पिस्तुल जवळ बाळगण्याची परवानगी (Permission)  मिळालीच कशी असे प्रश्न या घटनेमुळे निर्माण होत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!