पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपावर सडेतोड टीका 

0
32

मुंबई प्रतिनिधी: राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पुढील काही दिवसांत महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. यामुळे बीएमसी निवडणुकीपूर्वी घडत असलेल्या प्रकाराची कल्पना होती. यामुळे आम्ही सावध होतो, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

बंडामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. केंद्राच्या आदेशावरून हा सर्व प्रकार सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊन आदेश घेऊन येतात. यामुळेच त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं फोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेला संपवून भाजपला महापालिकेत सत्ता मिळवायची आहे.असा खोचकपणे टिका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मुंबईची महापालिका अनेक महापालिकांपेक्षा मोठी आहे. यामुळे बीएमसीवर सत्ता असणे महत्त्वाचे आहे, यामुळे शिवसेना फोडून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न भाजपा करत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच ईडी, दहशत आणि पैशांचा वापर केला. भाजप घाणेरडे राजकारण करीत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here