Fraud : गेल्या काही दिवसांपासून तरुणांना लग्नाच आमिष दाखवत फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशाच एका टोळीला येवला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतल आहे.(Fraud)
विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच येवला तालुक्यातील सायगाव आणि परिसरातील काही तरुणांना लग्नाच आमिष दाखवत फसवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्ञानेश्वर देवराव खैरनार या येवला तालुक्यातील तरुणाने याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एका टोळीला सिनेस्टाइल अटक केली आहे.(Fraud)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढले होते. दर 1000 पुरुषांमागे फक्त 800 मुली असल्याने सध्या तरुणांना विवाहासाठी मुलगीच उपलब्ध होत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे राज्यभरात एजंटगिरीचे प्रकार सध्या सुरू झाले आहेत.(Fraud)
विवाह इच्छुकांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत असतानाच विवाह जमवून देण्याच्या बहाण्याने राज्यभरात एजंटचा सुळसुळाट झाला आहे. हे एजंट अनाथ किंवा देहविक्री व्यवसाय करणाऱ्या मुलींच या तरुणांशी लग्न लावून देत त्यांची फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार येवला तालुका परिसरात घडला आहे.(Fraud)
https://thepointnow.in/saptshrungi-gad/
येवला तालुक्यातील ज्ञानेश्वर देवराम खैरनार या गारखेडा येथे राहणाऱ्या तरुणाला हा फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने येवला पोलिसात याबाबत तक्रार दिली. यानंतर येवला पोलिसांनी पथक तयार करत नागपूर येथून शंकर जगन शेंडे(राहणार गोंदेगाव, नागपूर) या आरोपीला वेशांतर करून सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे. त्याची कसून चौकशी घेतली असता त्याने आपल्या इतर साथीदारांची देखील नाव सांगितली व त्यानुसार योगेश पोपट जठार, अंजना योगेश जठार, सचिन प्रकाश निघोट, भाऊसाहेब दगू मुळे (सर्व राहणार सायगाव) यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्या संपर्कात असलेल्या काही महिला साथीदार या फरार झाल्या असून त्यांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.(Fraud)
फसवणूक झालेल्या तरुणांनी पुढे यावे
येवला तालुक्यातील ज्या तरुणांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ पुढे येऊन येवला तालुका पोलिसांसोबत संपर्क साधावा अस आवाहन येवला पोलिसांकडून करण्यात आल आहे.
सदरची कारवाई नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस नाईक राजेंद्र बिन्नर, महिला पोलीस शिपाई सुनीता महाजन, पोलीस शिपाई आबा पिसाळ, मुकेश जाधव यांसह पथकाने पार पाडली आहे.(Fraud)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम