Threatening calls : मुंबई मंत्रालय नियंत्रण कक्षाला अतिरेकी हल्ला होणार असल्याची धमकी

0
3

Threatening calls : मुंबईमधील मंत्रालय नियंत्रण कक्षाला येत्या एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ला करून उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.(Threatening calls)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय नेते, सार्वजनिक स्थळ यांसारख्या ठिकाणी हल्ला होणार असल्याच्या धमक्यांचे फोन सातत्याने येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ, नाना पटोले, यशोमती ठाकूर यांसह विविध नेत्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.(Threatening calls)

https://thepointnow.in/fraud/

यानंतर राज्यातील अनेक सार्वजनिक ठिकाणांवर अतिरेकी हल्ला होणार असल्याच्या फोन्समुळे पूर्ण राज्यभरात खळबळ माजली होती. यातच आता मुंबई मंत्रालयाला वर अतिरेकी हल्ला करण्यात येणार असल्याचा फोन आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आल आहे.(Threatening calls)

सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबई मंत्रालय नियंत्रण कक्षा मधील लँडलाईन वर एक फोन आला. यावेळी मंत्रालयावर अतिरेकी हल्ला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार फोन मध्ये सांगण्यात आलं नाही.(Threatening calls)

दरम्यान धमकीचा फोन येताच नियंत्रण कक्षाकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलीस देखील सतर्क झाले असून हा फोन ट्रेस करण्याच काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. दरम्यान या फोन कॉल चा तपास करत असताना ट्रेस झालेल्या लोकेशन नुसार कांदिवली येथून एका संशयताला ताब्यात घेण्यात आल आहे.

या फोनमध्ये खरंच काही तथ्य होते का? याची पडताळणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. सातत्याने येत असलेल्या या फोन्समुळे पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच प्रकारे मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येणार असल्याची धमकी देखील देण्यात आली होती.(Threatening calls)

एकीकडे राज्यातील विविध ठिकाणाहून अनेक दहशतवादाच ट्रेनिंग घेत असलेल्या संशयतांना ताब्यात घेण्यात आल आहे. दुसरीकडे स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना देशांमध्ये घातपात होणार असल्याची माहिती समोर आली होती. यातच आता राज्यात ठिकठिकाणी अतिरेकी हल्ला आणि बॉम्बस्फोटच्या धमक्या देण्यात येत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

दरम्यान सातत्याने वाढत असलेल्या या धमकीच्या फोन कॉल्समुळे सर्वांचीच चिंता वाढली असून, या सातत्याने येणाऱ्या धमक्यांचा नेमका अर्थ काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here