snake swallowed snake : सापाने सापाला खाल्लं अस कधी ऐकलंय का?

0
11

snake swallowed snake : जहर जहर को काटता है। हे आपण सर्वांनी ऐकलंच असेल मात्र साप साप करत आहे असं कधी ऐकले आहे का? नसेलच ऐकलं ना? पण असा एक विचित्र प्रकार नुकताच समोर आला आहे.

ही घटना घडली आहे नांदगाव तालुक्यातील बाणगाव टाकळी या ठिकाणी. नांदगाव तालुक्यातील बाणगाव टाकळी या ठिकाणी राहणारे शेतकरी सागर पवार यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीवर मोटर सुरू करण्यासाठी पवार गेले असताना त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले आणि यावेळी त्यांना विहिरीमध्ये साप असल्याचा आढळून आल.(The snake swallowed the snake)

दरम्यान त्यांनी याची गांभीऱ्याने दखल घेत नांदगाव येथील सर्पमित्र विजय बदोडे यांना तात्काळ फोन करून विहिरीमध्ये साप आढळून आला असल्याची माहिती दिली. आणि बदोडे यांनी तात्काळ पवार यांच्या शेतात धाव घेऊन अनेक प्रयत्नानंतर या सापाला विहिरीमधून बाहेर काढले.(The snake swallowed the snake)

https://thepointnow.in/threatening-calls/

या सापाला पकडताच हा कोब्रा जातीचा साप असल्याचा त्यांच्या लक्षात आलं आणि काही वेळातच या सापाने आपल्याच प्रजातीच्या कोब्रा सापाला पोटातून बाहेर टाकले सापाने भक्ष्यासाठी आपल्याच जातीच्या सापाला भक्ष्य केल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचं यावेळी सर्पमित्र विजय बदोडे यांनी सांगितल आहे.

यामध्ये भक्ष्य करण्यात आलेल्या कोब्रा सापाचा मृत्यू झाला होता. तर पकडण्यात आलेल्या कोब्रा सापाला बदोडे यांनी बंदिस्त करून वन विभागाच्या ताब्यात दिला आहे. यानंतर त्याला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल आहे.(The snake swallowed the snake)

सर्वात विषारी साप म्हणून कोब्रा सापाला ओळखलं जातं. हा साप अनेक प्राण्यांची शिकार करतांना याच्या नुसत्या दंश कारण्यानेच काही क्षणातच माणसाचा मृत्यू होत होतो. मात्र नांदगाव मध्ये घडलेली ही घटना अतिशय दुर्मिळ असून तितकीच विचित्र देखील असल्याने या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here