Skip to content

Rashtrawadi crisis : आणि शरद पवार म्हणाले राष्ट्रवादी एकच


Rashtrawadi crisis : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर सध्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादीवर दावा सांगितला होता. मात्र आता यावर शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामुळे नवीन चर्चांना उधाण आल आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा गट ब स्थापन केला होता. यामुळे राज्यातील राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप आला होता. जवळपास 40 आमदारांसह आठ नेत्यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारला समर्थन देत सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि यातून राष्ट्रवादी देखील शिवसेनेप्रमाणे दोन गट निर्माण झाले. यानंतर यापुढे अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता.

पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितल्यानंतर अजित पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका देखील दाखल करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांना आपलं मत स्पष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. याच नोटीसीला उत्तर देत असताना पक्ष आमचाच असून अजित पवार किंवा संभ्रम निर्माण करत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.(Rashtrawadi crisis)

https://thepointnow.in/snake-swallowed-snake/

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असून पक्षात कोणताही गट पडलेला नाही. अजित पवार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर आक्षेप घेत आम्ही तीन ऑगस्टला प्राथमिक प्रतिसाद दाखल केला होता. अजित पवार यांनी पक्ष चिन्हावर केलेला दावा फेटाळण्यात यावा तसेच पक्षांमध्ये दोन गट पडले असल्याचा पुरावा अजित पवारांकडे नसल्याने निवडणूक आयोगाने देखील कोणताही वाद आहे असं ठरवलं नाही. यामुळे या आधारावर अजित पवार यांची कागदपत्र फेटाळली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर दावा करणे अकाली घटनेच्या विरोधात काम करत असलेल्या प्रवृत्त व्यक्तींच्या व अपरिचित गटाच्या चुकीच्या दाव्यांचे खंडन करण्यास आम्ही बांधील नसून एक जुलै पूर्वी अजित पवार यांनी कोणतीही तक्रार केली नव्हती राष्ट्रवादीच्या कोणत्याही बैठकीला विरोधी केला नव्हता. यामुळे याचिका दाखल करणे हे अकाली असून त्यांची मागणी नाकारली पाहिजे असे देखील शरद पवार म्हणाले.(Rashtrawadi crisis )

जितेंद्र आव्हाड म्हणाले

राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असल्याबद्दल अजित पवार गटाने केलेले दावे खोटे असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं असून निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्राला आम्ही उत्तर दिल आहे. पक्षामध्ये फूट नाही असं आम्ही सांगितलं आहे. पाच जुलैला त्यांनी पत्र पाठवलं आणि 30 जूनच आहे असं सांगण्यात आलं असल्याने अजित पवार संभ्रम निर्माण करत असल्याचे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!