Skip to content

Saptshrungi Gad: सप्तश्रृंगी गड विकास आराखडयाच्या अंतिम मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे


Saptshrungi Gad: श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी देवी सप्तश्रृंगी गडच्या विकासा संदर्भात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाठपुरावा केला असून सुधारित प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी देण्याबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना पत्रव्यवहार केला आहे. गडाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही, येत्या काही दिवसात मंजुरी मिळून निधी वितरीत होवून कामांना प्रत्येक्षात सुरवात होणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. (Saptshrungi Gad)

पालकमंत्र्यांच्या आग्रही भूमिकेमुळे सप्तशृंगी गडाचा विकासाबाबत लवकरच निर्णय होणार आहे. सप्तशृंगी गड ब वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाच्या मुलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा शासनास सादर केला होता. उच्चाधिकार समितीने दिलेल्या सुचनांप्रमाणे मुळ आराखडयात बदल करून सुधारित आराखडा अंदाजपत्रकांसह दिनांक १२/०७/२०२३ रोजी ग्राम विकास विभागास सादर करण्यात आलेला आहे. यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वेळोवेळी बैठका घेत गडाच्या विकासासंदर्भात पाठपुरावा केला आहे. (Saptshrungi Gad)

श्री सप्तश्रृंगी देवी हे साडेतीन शक्ती पिठापैकी अर्धपीठ असुन मोठया संख्येने भाविक व पर्यटक येत असतात, त्यामुळे सुधारित आराखडयात नमूद केलेल्या मुलभूत व पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत आवश्यक असल्याने सुधारित आराखडयास मंजुरी देवून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी मंत्री भुसे यांनी पत्राद्वारे नुकतीच केली आहे.

श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी, सप्तश्रृंगी गड, ता. कळवण हे तिर्थक्षेत्र साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ आहे. त्याठिकाणी यात्रेकरिता साधारणतः 25 ते 30 लाख भाविक व पर्यटक येतात. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या संदर्भीय शासन निर्णयान्वये सदर क्षेत्रास “ब” वर्ग दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. सदर क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी पर्यटक व भाविकांसाठी मुलभूत व पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत आवश्यक आहे. अनुषंगाने सदर तिर्थक्षेत्राचा 2302:50 लक्ष इतक्या रक्कमेचा विकास आराखडा शासनास सादर करणेत आला होता. या संदर्भात मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, उच्चाधिकार समिती यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15.10.2018 रोजी बैठक संपन्न झाली सदर बैठकीत देण्यात आलेल्या सूचनाप्रमाणे मुळ आराखडयात बदल करुन एकुण रु. 2025.78 लक्ष रक्कमेचा सुधारीत आराखडा शासनास दिनांक 25.06.2019 रोजी सादर करण्यात आला आहे.

दरम्यान आराखड्यात प्रस्तावित असलेली काही कामे इतर योजनांमधुन सुरु करण्यात आली असल्यामुळे सदर कामे वगळून तसेच, भाविकांच्या गरजा, मागणीनुसार काही नविन कामांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत जिल्हास्तरावर मा. पालकमंत्री भुसे यांनी संबंधित मा. आमदार, लोकप्रतिनिधी, संबंधित ट्रस्ट पदाधिकारी, कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी, सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, इ. समवेत वेळोवेळी बैठका घेऊन सदर आराखड्यातंर्गत शासनास पहिल्या टप्प्यात सादर करावयाची अंदाजपत्रके संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांकडून तयार करुन घेण्यात आली आहेत. (Saptshrungi Gad)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!