Political crisis : आणि ठाकरे – शिंदे गटातील वाद गेला थेट अंगावर धावून जाण्यापर्यंत

0
1

Political crisis : छत्रपती संभाजी नगर मधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जोरदार राडा झाल्याचे बघायला मिळालं.

नेहमीप्रमाणे आजही छत्रपती संभाजी नगर मधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी संदिपान भुमरे यांनी अब्दुल सत्तार आणि आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे गदारोळ निर्माण झाला आणि यातच शाब्दिक चकमक देखील झाली.(Political crisis)

दरम्यान यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उदयसिंग राजपूत यांच्या मदतीला पुढाकार घेत मंत्री भुमरे आणि सत्तार यांना चांगलेच खडे बोल सुनावले आणि यामुळे या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळले आणि हा वाद थेट अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला होता.(Political crisis)

मागील काही महिन्यांपासून ठाकरे आणि शिंदे गटामधील वाद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं बघायला मिळत आहे. यातच छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये असाच एक वाद बघायला मिळाला. यामध्ये शिंदे गटाचे मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी बघायला मिळाली.

त्यानंतर झालं असं की ठाकरे गटातील आमदार उदयसिंग राजपूत यांनी अनेकदा मागून देखील आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि या प्रश्नाची दखल घेत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी याबाबत आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगून लेखी उत्तर देण्यात येईल अशी भूमिका घेतली.(Political crisis)

जिल्हाधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना देखील केल्या त्यानंतर ही बैठक सुरळीत झाली असली तरी मात्र झालेल्या वादामध्ये कोणीही कोणाच्या अंगावर धावून गेले नसल्याचा खुलासा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला आहे.

https://thepointnow.in/snake-in-matoshree/

शिंदे गटाचे आमदार म्हणतात

निधी वाटपामध्ये सत्ताधारी पक्षातील आमदारांना जास्तीचा निधी दिला जातो. हा अलिखीत नियम असून पूर्वी तुम्हाला जो निधी मिळायचा त्यामध्ये कमतरता झाली नसतांना आता तुम्हाला वाढीव निधी हवाय कशाला ? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.(Political crisis)

पालकमंत्री संदीपान भुमरे हे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जात आसाल तर असे कोणतेही प्रकार सहन केले जाणार नाही.(Political crisis)

दरम्यान कन्नडच्या आमदाराने आरोप केलाय, की माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा आला नाही. यावर पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे की, जजिल्हाधिकारी तुम्हाला यावर लेखी उत्तर देतील. तरीही त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यामुळे त्यांच्या या वक्तव्याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे(Political crisis)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here