Skip to content

बापरे तब्बल 24 लाखांची वीज चोरी ! ; गौळाणे शिवारातील घटनेने खळबळ


नाशिक : तालुक्यातील गौळाणे शिवारात एका प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखान्यात सुमारे २४ लाख रूपयांची वीज चोरी झाल्याचा प्रकार उघडीस आला.

वीज मीटरच्या मुख्य कनेक्शनमध्ये छेडछाड करून वीजचोरी होत असल्याचे नाशिकच्या भरारी टीमच्या निदर्शनास येताच तेथे छानविन करण्यात आली. गौळाणे गावातील शिवारात चुंबळे फार्म नजिक असलेल्या प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या या कारखान्याला डी. आर. जोशी या नावाने थ्री फेज वीजजोडणी देण्यात आलेली आहे.

येथे प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर हे आहेत. महावितरणच्या भरारी पथकाने प्लास्टिकचे दाणे तयार करणाऱ्या कारखान्याची पाहणी केली असता वीज मुख्य कनेक्शनमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. त्यामुळे कारखान्यात वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट झाले असून एकूण १ लाख ५९ हजार १५ विद्युत युनिटची म्हणजे एकूण २४ लाख ५३ हजार ५६० रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

नाशिकच्या महावितरण भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक भरारी पथकाचे इतर कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार, सहाय्यक अभियंता ए.जी. चव्हाण, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यु. इ. बागडे यांनी ही कारवाई केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!