नाशिकच्या सह्याद्री फर्म्समध्ये ३१० कोटींची थेट परकीय गुंतवणूक

0
15

नाशिक – जिल्ह्यातील अग्रगण्य शेती उत्पादक कंपनी सह्याद्री फार्म्समध्ये युरोपातील गुंतवणुकदारांच्या समूहाने तब्बल ३१० कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली आहे. ज्यात इकोफिन, कोरीस, एफएमओ आणि प्रोपाक यांचा या गुंतवणुकीत समावेश आहे.

यावेळी गुंतवणूकदारांच्या समूहाने सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची १०० टक्के मालकी असलेल्या ‘सह्याद्री फार्म पोस्ट हार्वेस्ट केअर लि.’ या कंपनीमध्ये थेट परकीय गुंतवणूक केली आहे. यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून फायदेशीर आणि शाश्वत स्वरुपात चालवण्याच्या कंपनीच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाला आहे.

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत सहाय्य देणारे सह्याद्री फार्म्स हे ग्रामीण उद्योजकतेचे उत्तम उदाहरण आहे. २०१० मध्ये विलास शिंदे व दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत युरोपात द्राक्षनिर्यात केली होती. त्याच गटाच्या साथीने कंपनीने आजपर्यंत ९ पिके, १८ हजार शेतकरी व ३१ हजार एकरांहून अधिक शेतीक्षेत्रे विस्तारीत केला आहे. त्यामुळेच ती आज देशातील आघाडीची फळे व भाजीपाला निर्यात व प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे.

ह्या परकीय गुंतवणुकीतून कंपनी आपले विस्तारीकरण करणार आहे. ज्यात कंपनी कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, पॅक हाऊस आदि प्रकल्प उभारणार आहे. तसेच कंपनीला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वाढवायची आहे. दरम्यान, गुंतवणुकीच्या प्रक्रियेत अल्पेन कॅपिटलने कंपनीसाठी विशेष धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here