राज्य सीईटी परीक्षा २०२२चा निकाल जाहीर; इथे पाहता येणार तुम्हाला निकाल !

0
2

नाशिक – महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा २०२२ (MHT-CET 2022) चा निकाल आज जाहीर झाला आहे.

संध्याकाळी पाच वाजल्यापासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) या विषयांसाठीच्या परीक्षेचा निकाल संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे.

यंदाच्या वर्षी सामायिक प्रवेश परीक्षा पीसीएमसाठी ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्टदरम्यान तर पीसीबीची परीक्षा १२ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) म्हणजे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र पाऊस व अन्य कारणांमुळे पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी २८ ऑगस्ट २०२२ रोजी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. यापूर्वी परीक्षेची उत्तर की प्रसिद्ध करण्यात आली होती.

उमेदवार cetcell.mahacet.org किंवा mhtcet2022.mahacet.org या लिंकला भेट देऊन परीक्षेचा निकाल बघू शकता व ऑनलाईन मार्कशीट डाउनलोड करु शकता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here