Skip to content

पॅनकार्ड अपडेटच्या नावाखाली भामट्याने केली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक


नाशिक – पॅनकार्ड नुतनीकरणाच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विजयकुमार गोविंदराव ठुबे (रा. पुणे) असे या फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव असून ते काही कामानिमित्त नाशिकला आले होते. दरम्यान, रविवारी (ता.११) एका मोबाईल क्रमांकावरून अज्ञात भामट्याने ठुबे यांना मेसेज केला. त्यानंतर त्याने फोनवर संपर्क साधत तुमच्या एचडीएफसी बँकेच्या खात्याला जोडलेले पॅनकार्ड अपडेट केले नाही तर तुमचे बँक खाते बंद करण्यात येईल, अशी भीती घातली होती.

त्यासाठी त्या भामट्याने पाठविलेल्या मेसेजवरील लिंकवर जाऊन बँक खात्याच्या माहितीसह गोपनीय माहिती व मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक भरण्यास सांगितले. ठुबे यांनी त्याप्रमाणे तशी माहितीही भरली. मात्र, पाठवलेल्या माहितीच्या आधारे त्या भामट्याने ठुबे यांच्या बँक खात्यातून १ लाख ९९ हजार ३४२ रुपये ऑनलाइन परस्पर काढली.

याप्रकरणी ठुबे यांनी आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्वरित नाशिक सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात भामट्यासह संबंधित बँकेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीसचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली हे ह्याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!