Skip to content

निवडणूक लागली नानांच्या स्वप्नाला सुरुंग; नाराज ठरणार गेम चेंजर


देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार की दोन पॅनेलमध्ये लढली जाणार असा संभ्रम कायम असताना आज माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मात्र शेवटी सोसायटी व व्यापारी गटात निवडणुक लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडून देखील निवडणूक लागल्याने नाराज कुणाचा गेम करणार हे मात्र बघणे महत्वाचे असेल.

उदयकुमारांचे तालुक्यातील राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे, बघा सविस्तर मुलाखत

 

रविवारी (दि.१६) रोजी देवळा तालुका पत्रकार संघाने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व उमेदवारांना एकत्रित आणत निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सहविचार बैठक घेतली. बाजार समितीच्या हितासाठी अन विकासासाठी होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा अनेकांनी यावेळी व्यक्त केल्याने याबाबत समिती स्थापन करून निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्वाधिकार सदर समितीकडे देण्यात आले होते मात्र या सर्व घडामोडींना सुरुंग लागत आज निवडणुक लागली आहे.

येथील बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २८ एप्रिल रोजी होत असून १२९ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. बिनविरोध व्हावी यासाठी देवळा तालुका पत्रकार संघाने येथील विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करत याबाबत चर्चा घडवून आणली. ज्येष्ठ पत्रकार नितीन शेवाळकर यांनी प्रास्ताविक करत निवडणूक बिनविरोध होण्यामागची भूमिका मांडली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व उमेदवारांनी आपापली मते मांडत निवडणूक बिनविरोध करण्यास हरकत नसून त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली होती.

माघारीच्या दिवशी भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले मात्र त्यांना यात यश आले नाही. बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर यांनी आधीपासूनच all is well ची भूमिका घेतल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

सन १९९९ साली तत्कालीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून स्वतंत्र देवळा बाजार समिती निर्माण व्हावी यासाठी देवळा पत्रकार संघाने तत्कालीन मंत्री डॉ.दौलतराव आहेर, ए.टी. पवार, आमदार शांतारामतात्या आहेर यांचेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्रित आणत यशस्वी प्रयत्न केले होते. त्याच धर्तीवर आजची बैठक घेत पहिले पाऊल टाकण्यात आले.

“निवडणूक बिनविरोध होणार असेल तर पहिली माघार माझी असेन असे सांगून केदा आहेर यांनी माघार घेतली मात्र घरातील होम मिनस्टर यांना मात्र मैदानात ठेवत मोठी खेळी खेळली आहे. बिनविरोध प्रक्रिया राबवायला हवी यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केलेत. मात्र त्यांच्या या राजकीय महत्वाकांक्षेला सुरुंग लागला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!