दहा जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात; नेत्यांना नाराजी भोवणार

0
10
देवळा बाजार समितीच्या माघारीच्या दिवशी उमेदवारांना मार्गदर्शन करतांना माजी सभापती केदा आहेर, योगेश आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी एकूण १८ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या तर उर्वरित दहा जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. १२९ उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी १०३ माघारी झाल्या.

उदयकुमारांचे तालुक्यातील राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे, बघा सविस्तर मुलाखत

निवडणूक लागली नानांच्या स्वप्नाला सुरुंग; नाराज ठरणार गेम चेंजर
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध होणेकामी सर्व सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित आणत देवळा पत्रकार संघाने आवाहन केले असता सदर निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असताना एक-दोन जागांचा तिढा न सुटल्याने १० जागांसाठी निवडणूक लागली. यात बाजार समितीच्या सर्वसाधारण सोसायटी गटाच्या सात जागांसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी तीन व हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत.

देवळा बाजार समितीच्या माघारीच्या दिवशी उमेदवारांना मार्गदर्शन करतांना माजी सभापती केदा आहेर योगेश आहेर आदी<br >छाया सोमनाथ जगताप

दरम्यान बिनविरोध झालेल्या उमेदवारांची गटनिहाय नावे पुढीलप्रमाणे;
सोसायटी सहकारी संस्थेच्या मतदारसंघात महिला राखीव जागेवर धनश्री केदा आहेर व विशाखा दीपक पवार यांची तसेच इतर मागास वर्ग गटात दिलीप लालजी पाटील आणि विजा-भज मध्ये दीपक काशिनाथ बच्छाव यांची बिनविरोध निवड झाली.

याशिवाय ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारणमध्ये रेश्मा रमेश महाजन व शाहू गंगाधर शिरसाठ, अनुसूचित जाती व जमाती मध्ये भास्कर बाबुराव माळी तर आर्थिक दुर्बल गटात शीतल योगेश गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक लागलेल्या सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण सात जागांसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची नावे याप्रमाणे,
अरुण पोपट आहिरे, शिवाजी दोधा आहिरे, महेंद्र बळवंत आहेर, योगेश शांताराम आहेर, अभिजित पंडितराव निकम, शशिकांत श्रीधर निकम, पोपट महादू पगार, भाऊसाहेब निंबा पगार, अभिमन वसंत पवार, शिवाजीराव भिका पवार, कडू भिला भदाणे, वसंत राजाराम सूर्यवंशी, विजय जिभाऊ सोनवणे अशी आहेत.

व्यापारी गटातील दोन जागांसाठी अमोल महारू आहेर, निंबा वसंत धामणे, संजय दादाजी शिंदे

हमाल-मापारी गटाच्या एका जागेसाठी विजय नारायण आहेर व भावराव बाबुराव नवले हे समोरासमोर लढणार आहेत. दरम्यान , सम्पूर्ण निवडणूक बिनविरोध झाली नाही . अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या . बिनविरोध निवड प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली . तर सोसायटी गटातील शिल्लक सात जागांसाठी एकूण तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले असून, यात मोठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे. माघारीसाठी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची दमछाक पहावयास मिळाली . यामुळे एन उन्हात राजकीय धुराळा उडणार असून ,याचा आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आदी निवडणुकीत परिणाम होणार असल्याचे यावेळी काही जाणकारांनी बोलून दाखवले . बाजार समिती साठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून ,मतदान सम्पल्या नंतर लागलीच मतमोजणी होणार आहे. याकडे देवळा तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here