देवळा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा या संघटनेच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी देवळा येथील नाशिक जिल्हा संताजी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी सोनूसेठ शेजवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समाधान चौधरी व सचिव दिलीप सौंदाणे यांनी शेजवळ यांना तशा अशायचे नियुक्ती पत्र नुकतेच दिले आहे.
उदयकुमारांचे तालुक्यातील राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे, बघा सविस्तर मुलाखत
संभाजी शेजवळ हे महासभेचे क्रियाशील कार्यकर्ते असून, समाज कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. याची दखल घेऊन त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे , उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष गजाजन शेलार, सहसचिव बळवंत मोरघेडे, विभागीय अध्यक्ष अड शशिकांत व्यवहारे आदींसह जगन देवरे, प्रकाश जाधव ,नंदू पवार, पुंजाराम जाधव , अशोक लोखंडे, प्रकाश नेरकर , संजय जाधव , नंदू जाधव आदींनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम