Skip to content

नानांनी करून दाखवले ; देवळा नगरपंचायत राज्यात तिसरी


देवळा : नाविन्यपूर्ण संकल्पना व उल्लेखनीय काम केल्याने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत देवळा नगरपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक मिळवत पाच कोटी रु.चे बक्षीस पटकावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास प्रधान सचिव सोनिया शेट्टी आदींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी शामकांत जाधव, नगराध्यक्षा सुलभा आहेर व इतरांनी सदर परितोषिकेच्या रकमेचा धनादेश व सन्मानपत्र स्वीकारले. गुरुवार (दि.२०) रोजी नगरविकास दिनानिमित्त मुंबईत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

मुंबई : देवळा नगरपंचायतीला तृतीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना मुख्याधिकारी शामकांत जाधव, समवेत नगराध्यक्षा सुलभा आहेर, नगरसेविका भाग्यश्री पवार, रत्ना मेतकर, अभियंता सुयोग पाचपाटील आदी (छाया – सोमनाथ जगताप )

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत देवळा नगरपंचायतने भाग घेत गत महिन्यात विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. स्वच्छ देवळा – सुंदर देवळा उपक्रमांतर्गत आमदार डॉ.राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या योगदानातून देवळा शहरात विविध उल्लेखनीय कामे झाल्याने त्याचा फायदा या स्पर्धेसाठी झाला. शिवस्मारक, नदीपात्रातील स्वच्छता, पाणी अडवा- पाणी जिरवा उपक्रम, वारसा हक्क म्हणून पाच कंदिलचे सुशोभीकरण, बाजारतळ आदी बाबींची राज्यसरकारकडून आलेल्या पथकाने पडताळणी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र करत आणि त्यातही तृतीय क्रमांक येत सदर पाच कोटी रुपयांचे बक्षीस देवळा नगरपंचायतीला मिळाले.

उदयकुमारांचे तालुक्यातील राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे, बघा सविस्तर मुलाखत

मुंबईत झालेल्या कार्यक्रमावेळी उपनगराध्यक्ष अशोक आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, नगरसेवक जितेंद्र आहेर, करण आहेर, मनोज आहेर, भाग्यश्री पवार, रत्ना मेतकर, शीला आहेर, मुख्याधिकारी शामकांत जाधव, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुयोग पाचपाटील, शहर समन्वयक पूनम भामरे, तुषार बोरसे, दीपक सूर्यवंशी ,राजू शिलावट आदी उपस्थित होते. देवळा नगरपंचायतीच्या यशात हा मानाचा तुरा खोवल्याने येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदर पाच कोटींचा निधी हा शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण यासाठीच वापरण्यात येणार असल्याचे नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!