देवळा: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण सात जागांसाठी तेरा उमेदवार , व्यापारी मतदार संघातील तीन व हमाल तोलारी मतदार संघातील दोन असे एकूण अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.
निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आली . सोसायटी मतदार संघ गट / त्यांची नावे व निशाणी याप्रमाणे अरुण पोपट आहिरे,(नारळ ) , शिवाजी दोधा आहिरे( विमान ), महेंद्र बळवंत आहेर(कपबशी), योगेश शांताराम आहेर( विमान ), अभिजित पंडितराव निकम(विमान ) , शशिकांत श्रीधर निकम (कपबशी ), पोपट महादू पगार(बस ) , भाऊसाहेब निंबा पगार( विमान ) , अभिमन वसंत पवार(विमान ) , शिवाजीराव भिका पवार(विमान ), कडू भिला भदाणे(छत्री ), वसंत राजाराम सूर्यवंशी,(कपबशी), विजय जिभाऊ सोनवणे(विमान )
उदयकुमारांचे तालुक्यातील राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे, बघा सविस्तर मुलाखत
व्यापारी गटातील दोन जागांसाठी अमोल महारू आहेर (गॅस सिलेंडर ), निंबा वसंत धामणे,(विमान ) , संजय दादाजी शिंदे ( विमान ) आणि हमाल-मापारी गटाच्या एका जागेसाठी विजय नारायण आहेर(जीप गाडी ), भावराव बाबुराव नवले(रोड रोलर ) या प्रमाने निशाण्या वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली .
गुरुवारी दि २० रोजी माघारीच्या अंतिम दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या यावेळी .माघारीसाठी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची दमछाक झाली होती .विठेवाडी येथील सोसायटी गटातील उमेदवारांनी निवड समितीने येथील माजी संचालकाच्या पुत्राचे बिनविरोध निवड प्रक्रियेत नाव घोषित केल्याने उर्वरित उमेदवारांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी माघार घेतली नाही . तर खालप येथील उमेदवार वसंत सूर्यवंशी यांनी आपल्या पत्नीवर अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे त्यांनीही उघड नाराजी व्यक्त केल्याने माघार घेतली नाही . या तीन उमेदवारांनी एकत्र येऊन पॅनलची निर्मिती करून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे . विशेष म्हणजे यातील दोन उमेदवार माजी सभापती केदा आहेर यांचे तर एक उमेदवार योगेश आहेर यांचा खंदा समर्थक आहे .त्यांनी थेट नेत्यांविरुद्ध दंड थोपटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे .
दरम्यान , आज सोसायटी गटातील उमेदवार पोपट पगार , कडू भदाणे ,अरुण अहिरे यांनी जाहीर माघार घेऊन शेतकरी विकास पॅनलला आपला जाहीर पाठींबा दर्शविला . यावेळी माजी सभापती केदा आहेर ,योगेश आहेर पंडितराव निकम ,भाऊसाहेब पगार , कैलास देवरे ,चिंतामण आहेर ,योगेश गुंजाळ ,छबू भामरे ,जगदीश पवार , अभिमन पवार आदी उमेदवार व सभासद उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम