स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगरपंचायतीला शासनाकडून मिळालेल्या घंटागाडीचे लोकार्पण

0
3
देवळा नगरपंचायतीच्या वतीने घंटा गाडीचे लोकार्पण करतांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर समवेत नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर आदी नगरसेवक (छाया - सोमनाथ जगतात)

देवळा : स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२२-२३ अंतर्गत देवळा नगरपंचायतीला शासनाकडून मिळालेल्या घंटागाडीचे लोकार्पण भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी ” स्वच्छ देवळा सुंदर देवळा “ची संकल्पना मांडली असून, त्या अनुषंगाने शहराची वाटचाल सुरू आहे. शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत देवळा नगरपंचायतीला दोन घंटागाडी,दोन ट्रॅकर वितरित करण्यात आले असून, त्याचा लोकार्पण आज बुधवार दि १९ रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले .

देवळा नगरपंचायतीच्या वतीने घंटा गाडीचे लोकार्पण करतांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर समवेत नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर आदी नगरसेवक (छाया – सोमनाथ जगतात)

यावेळी नगराध्यक्षा सुलभा आहेर ,उपनगराध्यक्ष अशोक आहेर, नगरसेवक मनोज आहेर, करण आहेर, भाग्यश्री पवार,रत्ना मेतकर ,संतोष शिंदे, कैलास पवार ,माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर,अश्विनी चौधरी ,आदींसह प्रतीक आहेर, अनिल आहेर ,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर,अतुल पवार,दिलीप आहेर, प्रदीप आहेर,किशोर आहेर आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here