Skip to content

एकनाथ शिंदे फुटीच्या उंबरठ्यावर ? ; सुरत मध्ये त्यांची काही नेत्यांसोबत चर्चा


मुंबई : महाविकास आघाडीचे 21 मते फुटल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC election 2022) पहिल्या फेरीत भारतीय जनता पक्षाचे (BJP) पाच उमेदवार विजयी झाले. पाचवे उमेदवार प्रसाद लाड देखील दुसऱ्या फेरीत विजयी झाले. मात्र, यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे काल सायंकाळ पासून नॉट रीचेबल असून ते पक्षावर नाराज असल्याची परिस्थिती समोर आली आहे. शिवसेनेत मोठी फूट असल्याची चर्चा समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार शिंदे हे गुजरात मध्ये असल्याचं समजत आहे. आज दुपारी 12 वाजता सेनेची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला शिंदे उपस्थित राहता का हे बघण महत्वाचे आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वतःचा पक्षाचा असलेल्या शिवसेनेसोबत असलेल्या एकुण मतांपैकी तब्बल ११ मते कुठे गेली असा प्रश्‍न उपस्थीत झाला आहे. अकरापैकी तीन मते शिवसेनेची स्वत:ची होती. ही तीन मतेदेखील शिवसेना राखू शकलेली नाही, यामुळे सेनेची पूर्ती अब्रू गेली आहे. सेनेसोबत असलेले प्रहार वाले देखील फुटले का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र सेनेचा वचक नसल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी एका आमदाराचे निधन झाले. आता शिवसेनेकडे स्वत:ची ५५ मते होती. यापैकी त्यांच्या दोन उमेदवारांना पहिल्या पंसतीची ५२ मते मिळाली. म्हणजे ५५ पैकी तीन मते फुटली. या शिवाय शिवसेनेसोबत असलेल्या पाच अपक्ष व इतर तीन मतांचा विचार केला तर शिवसेनेसोबत असलेली एकुण ११ मते फुटल्याचे स्पष्ट होत आहे.

सेनेत मतदानाच्या आधी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी होती. हे खरे झाले असून या प्रक्रियेत ते कुठेच सहभागी नसल्याचे सांगितले जात होते. ते नाराज असल्याने शिवसेनेच्या मतांवर काही परिणाम झाला का, याचा आता शोध घेण्यात येत आहे. शिवसेनेचे विजयी उमेदवार सचिन अहिर यांना याबाबत विचारले असता त्यांनी सेनेची मते फुटली नसल्याचा दावा केला तरी किती अब्रू झाकणार हा प्रश्न आहे. शिवसेना शिस्तबद्ध पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय वर्तुळात मात्र विधान परिषदेच्या निकालात काॅंग्रेस आणि शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडे अपक्षांची जबाबदारी होती. या अपक्षांनी सेनेची साथ सोडल्याचे मतांवरून दिसून आले, संजय राऊत यांनी वेळोवेळी अपक्ष आमदारांना डिवचले असून नेमक त्याचा वचपा काढण्यासाठी हे झाले का हे बघण महत्वाचे आहे.

या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत केल्याने कॉंग्रेसच्या उमेदवारांवर त्यांना लक्ष देता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र स्वत:चे ४४ इतके संख्याबळ असताना दोनपैकी कॉंग्रेसचा एकही उमेदवार पहिल्या पसंतीक्रमानुसार निवडून येऊ शकले नाहीत. हे पक्षाला चिंतन करायला लावणारं आहे. काँग्रेस सत्तेत असून ही विदारक परिस्थिती पक्षाला खाईत लोटणारी ठरणार आहे.

शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले असले तरी शिवसेनेची स्वत:ची तीन व सोबत असलेली आठ मते कुठे गेली याचा शोध शिवसेनेला घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर महाविकास आघाडीचा पराभव झाला असून शिवसेना व राष्ट्रवादी यांनी स्वत:चे उमेदवार निवडून आण्यावर लक्ष केंद्रीत केल्याने कॉंग्रेसकडे दुर्लक्ष झाले आहे. आता सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!