Skip to content

बिबट्याच्या हल्ल्यात चौथीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू दिंडोरी तालुक्यातील दुर्दैवी घटना


वैभव पगार
म्हेळूस्के वार्ताहर : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील ४ थी च्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याच्या बातमीने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ,
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील जि.प. शाळेत इयत्ता ४ थी मध्ये लहाणु उर्फ करण मच्छिंद्र गवारी हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत होता. सोबत ४ ते ५ विद्यार्थी होते. सर्वात शेवटी असलेल्या करणवर बिबट्याने झडप घातली.
निळवंडी कॅनॉल लगत नाईकवाडी परिसरातुन जात असतांना ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलाचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत असून दिवसासुद्धा बिबट्याचे दर्शन होते त्यामुळे नागरिकांत वर्गात घबराटीचे वातावरण आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!