सरकार कोसळणार मोठा राजकीय भूकंप; आदित्य ठाकरे शिंदेंमध्ये टोकाचे मतभेद, गुजरात पोलिस त्यांच्या संरक्षणाला

0
2

राज्यात मोठा भूकंप घडला असून शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे हे नॉट रिचेबल असेल तरी ते गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. सेनेचे कद्दवर नेते एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत असल्याने त्यांचे लोकेशन ट्रेस झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 आमदारही असल्याची माहिती असून ली मिरिडियन हॉटेल मध्ये शिंदे असून मोठा पोलीस बंदोबस्त गुजरात सरकारने दिला आहे.

काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त कधीपासून समोर येत होती. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती तेव्हा या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज दुपारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का? याकडे लक्ष लागलं आहे सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्यासोबत मतभेद असल्याने ते नाराज असल्याचे बोलणे जात आहे.

सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली मात्र आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे घेणार टोकाची भूमिका?

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पक्षाने बघितले असे समोर आले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here