Skip to content

एकनाथ शिंदे बंडाच्या पवित्र्यात; भाजपा नेत्यांसोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर


मुंबई प्रतिनिधी ; एकनाथ शिंदे बंडखोरीच्या उंबरठ्यार असल्यानं चर्चांना उधाण आलंय. अखेर एकनाथ शिंदे यांचा ठावठिकाणा लागलाय. एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये असल्याची माहिती समोर आली असून. एकनाथ शिंदे हे गुजरामधील सूरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. 11 आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत. तिथे काही भाजपा नेते भेटण्यासाठी गेल्याची माहिती देखील अमोर आली आहे

काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. अकरा आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार का, ते भाजपात जाणार का यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. ज्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत.

ग्रॅन्ड भगवती हॉटेलचं नाव बदललं
ग्रॅन्ड भगवती हॉटेलचं नाव नुकतंच बदलून आता ली मेरिडिअन असं करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सोबत असल्याची माहिती कळतेय. एकनाथ शिंदे नाराज असल्याचा कारणामुळे रात्रभर बैठकांचं सत्र सुरु आहे. मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती व्यक्त केली जातेय. सरकार देखील अल्पमतात आले आहेत.

गुजरात भाजपा नेते शिंदेंच्या भेटीला

काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. सुरत एअरपोर्टपासून दोन मिनिटांवर हे हॉटेल आहे. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जातेय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती लोक आहेत, तो आकडा स्पष्ट झालेला नाही. अकरा आमदार एकनाथ शिंदेंसबोत असल्याची शक्यता आहे. मात्र या हॉटेल बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसंच कोणत्याही माध्यमकर्मींना जाण्यात मज्जाव करण्यात आला असून गुजरात भाजपा नेते त्यांना भेटल्याची चर्चा समोर आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!