Skip to content

मराठी माणूस! सुशीलकुमार शिंदे होणार पुढचे राष्ट्रपती?


द पॉईंट नाऊ ब्युरो : येऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी आपला उमेदवार द्यायचाच हे विरोधी पक्षांनी निश्चितच केलेले आहे. असे स्पष्ट दिसून येत आहे. आता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचं नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पुढे केले जात असल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी लगबग सुरू आहे. त्यांच्याकडे निश्चित पाठबळ आहे. मात्र काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या निवडणुकीत भाजपला आव्हान द्यायचेच हे निश्चित केले आहे. आत्तापर्यंत शरद पवार, फारुख अब्दुल्ला, महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी यांची नावे काँग्रेसकडून विचाराधीन होती. मात्र या तिघांनीही माघार घेतल्याने आता काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. याबाबत काँग्रेस समितीसोबत बोलणे झाल्याबरोबर सुशीलकुमार शिंदे दिल्लीत झाले आहेत.

जुलै महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होते आहे. आणि त्यासाठी भाजपला आव्हान द्यायचेच, आपला उमेदवार राष्ट्रपती करायचाच हा चंगच विरोधी पक्षांनी केला आहे. आणि त्यात मराठी माणसाचेच नाव दोनदा पुढे आल्याने, पुन्हा एकदा राष्ट्रपती मराठी माणूस होणार का? असा प्रश्न आणि उत्कंठा देखील ताणली गेली आहे. आता याबाबत लवकरच काय ते चित्र स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!