CM Eknath Shinde | अन् ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडलं; चिमूकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांचेही राजकारण

0
55
Eknath Shinde
Eknath Shinde

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रत्नागिरी येथील एका सभेमध्ये झालेल्या विधानाला आपल्या ऑफिशियल ‘Xc (ट्विटर) अकाउंट वरून पोस्ट करत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला. नेमके काय होते प्रकरण जाणून घेऊया.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बलात्काराच्या खटल्याला फास्टट्रॅक कोर्टात नेऊन दोन महिन्यांच्या आत फाशी दिल्याचे विधान रत्नागिरीमध्ये एका सभेत केले होते. या विधानाला खोडून काढत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा हा जुना व्हिडिओ पोस्ट करत, “महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपीला फाशी दिली? त्याचे पुरावे सादर करावे.” असे म्हणत आव्हान दिले. “सभेमध्ये मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलतात. युती सरकारने बलात्कारच काय तर साध्या आरोपीला देखील शिक्षा केलेली नाही. असं म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडल. आरोपीला फाशी दिली त्याचे नाव जाहीर करावे. असे म्हणत सरकारला खुले आव्हान दिले.

Maharashtra News | महाराष्ट्रातील ‘लापता लेडीज’ची संख्या लाखांवर; धक्कादायक आकडेवारी समोर

“जनतेसमोर मुख्यमंत्री महोदय सर्रास खोटं बोलत आहेत. बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन स्वतःची पाठ स्वतःहून थोपटून घेत असल्याचा घणावाती आरोप केला.” विरोधकांनी केलेल्या या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत त्या खटल्याची तारखेनुसार संपूर्ण माहिती शिवसेनेच्या ऑफिशियल ‘X’ (ट्विटर) हॅण्डल वर पोस्ट करत दिली. आमच्या माता भगिनी, लहान मुली यांच्या अंगावरती हात टाकणाऱ्या, त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही नराधमाला अभय मिळणार नाही. रत्नागिरीतील त्या सभेतील भाषणात न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देखील दिला होता. परंतु न्यायालयीन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसणारे काही लोक या गोष्टीच भांडवल करतायत. माझ्या वक्तव्याला चुकीचा नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला.

High Court | महिला अत्याचाराच्या घटनांना पोलिस गांभीर्याने घेत नाही..?; न्यायालयाने पोलिसांना खडसावले

काय होता तो व्हायरल खटला? 

मावळ मध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खूनाप्रकरणी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात नेण्यात आला होता. ज्याचा उल्लेख रत्नागिरीतील भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या व्हायरल व्हिडिओमध्ये केलेला आहे.

खटल्याचा घटनाक्रम पुढील प्रमाणे:

1. 02/08/2022 गुन्हा घडलेली तारीख.

2. 02/08/2022 रोजी एफ.आय.आर नोंदवण्यात आली.

3. 03/08/2022 आरोपीला अटक.

4. 12/09/2022 आरोप पत्र दाखल करण्यात आलेली तारीख.

5. 16/03/2023 एफ.आय.आर नोंदवल्यानंतर 40 दिवसात आरोप पत्र दाखल. (तपास पूर्ण)

6. 12/05/2023 आरोप निश्चिती नंतर साक्षीपुरावे तपासणी.

7. 22/03/2024 निकाल जाहीर केलेली तारीख.

2022 मध्ये घडलेल्या या घटनेला फास्टट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील मुख्य आरोपी तेजस दळवी याला चार महिन्यांपूर्वी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून, या सरकारच्या काळात आमच्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेमध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही. अशा नराधमांना या सरकारच्या काळात कदापी अभय मिळणार नाही. अत्याचार करणाऱ्यांना मुळीच पाठीशी घालणार नाही. स्त्री अत्याचार व बलात्कारासारख्या दुर्दैवी घटनांच राजकारण करू नये. न्याय मिळवून देण्यासाठी पाठीशी उभे राहावे. राजकारण होतच राहील असं म्हणत झालेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here