MPSC Exam Update | शरद पवार आयत्या पीठावर रेगोट्या मारतायत; भाजपने डिवचले

0
38

MPSC Exam Update : लोकसेवा आयोगाकडून येत्या रविवारी 25 ऑगस्टला एमपीएससीची नागरी सेवासंयुक्त पूर्व परीक्षा घोषित करण्यात आली होती. मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुका त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा यामुळे अनेकदा या परीक्षेची तारीख आयोगाकडून पुढे सरकवली गेली. परंतु ही परीक्षा 25 ऑगस्टला जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली. याचं कारण म्हणजे आयबीपीएस ने जाहीर केलेली बँकिंग क्षेत्रातील विविध पदभरतींसाठीची परीक्षा. खरंतर ही परीक्षा आयबीपीएस नं वर्षभरापूर्वीच जाहीर केली होती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरले होते. पण परीक्षेची तारीख एकच असल्यामुळे स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. बघायला गेलं तर वर्षभर दोनही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाणार होत. असं होऊ नये म्हणून संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्याच्या शास्त्रीनगर येथे मंगळवार 20 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनामध्ये एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच अन्य काही मुद्दे देखील मांडण्यात आले होते. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून चांगलाच पाठिंबा मिळाला. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी याची दखल घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकरणाची दखल घेत “सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अन्यथा मी स्वतः आंदोलनात सामील होईल.” असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यालाच खोडून काढत आशिष शेलार यांनी शरद पवार यांना टोला लगावला. आपल्या ऑफिशियल X (ट्विटर) हँडल वरून ट्विट करत त्यांनी हे वक्तव्य केले.

MPSC Exam | विद्यार्थ्यांचं आंदोलन फळलं..!; MPSC चा मोठा निर्णय

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार

“मा. शरद पवार साहेब विद्यार्थ्यांच्या हितासाठी तुम्ही आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला. परंतु तुम्ही स्वतः तातडीने आयोगाशी बोलून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवू शकला असता. पण तुम्ही तसं केलं नाहीत. महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय. आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीसांनी आयोगाकडे विद्यार्थ्यांच्या तारखेबाबतच्या मागणीची दखल घेण्यात यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर आयोगाकडून नुकतीच परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून तुम्हाला ही गोष्ट माहीत नसणे शक्य नाही. परंतु तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असेल तर जनता बघते आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आयत्या पिठावर रेगोटे मारण्याचे काम करता आहात. असे म्हणत आशिष पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Assembly Elections | विधानसभेसाठी मविआ सज्ज..!; जागा वाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार

एमपीएससीच्या आणि आयबीपीएसच्या परीक्षेची तारीख एक झाल्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यामध्ये आंदोलन केले जात होते. या आंदोलनामध्ये मुख्यत्वे एमपीएससी परीक्षेची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी केली जात होती. या आंदोलनाला महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्यात आला. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ” विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं ही सरकारची जबाबदारी आहे परंतु सरकारी याकडे गांभीर्याने बघत नसल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे उद्यापर्यंत या प्रकरणावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर मी स्वतः पुण्याच्या आंदोलनस्थळी येऊन आंदोलनात सहभागी होईन.” असं म्हणत सरकारला इशारा दिला होता.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here