Skip to content

शिंदे सोबत 25 आमदार ,परब यांना EDची नोटीस अन् शिंदे नाराज ; भाजपाचे ऑपरेशन लोटस सुरू


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता टोकाला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती होती मात्र ही संख्या मोठी असल्याचे वर्तवण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून सरकार अल्पमतात आल्याची माहिती आहे

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला हा मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त असून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली असून हा आकडा 20 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे, यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली यात अनेक आमदार गैरहजर होते.

सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती होती मात्र त्यांच्या या धक्क्याने सेनेची डोके दुखी वाढणार आहे.

आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर तातडीची सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, माञ शिंदे यांनी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सेनेची तातडीची बैठक सेना खासदारांना देखील मुंबईत बोलावले…

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!